शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, माहिम स्थानकात पॉइंट बिघाड; फास्ट ट्रॅकवरील लोकल उशीराने
2
"खाने के लाले, लडने में सबसे आगे...!" रडत-पडत कर्ज मिळवलं अन् संरक्षण बजेट २०% नं वाढवलं; दहशतवाद पोसणाऱ्या PAK चा खरा चेहरा समोर
3
Sonam Raghuvanshi : राजाच्या हत्येचा प्लॅन अयशस्वी झाला असता तर काय करणार होती सोनम? बॅकअप प्लॅन तयार
4
ट्रेन प्रवासाची चिंता मिटली! आता २४ तास आधीच मिळेल कन्फर्म सीटची अपडेट, कधीपासून लागू होणार?
5
कुणाल कपूरच्या गुड लूक्सवर चाहते फिदा, 'रामायण'च्या सेटवरचा फोटो केला शेअर? चाहते म्हणाले...
6
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
7
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
8
आजचा अग्रलेख: हे पवार, ते पवार आणि 'पॉवर'
9
एक गेली आता दुसरी आली! श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाला ट्रॉफी जिंकण्याची संधी
10
अवघ्या ९० चेंडूत १९० धावा! पुन्हा एकदा वैभव सूर्यवंशीची बॅट तळपली, गोलंदाजांना फुटला घाम
11
शुभांशू शुक्ला यांची अंतराळ मोहीम पुन्हा स्थगित; ऑक्सिजन गळतीमुळे मिशनला लागला ब्रेक
12
जीप-ट्रकची भीषण टक्कर; वधुसह ५ जणांचा जागीच मृत्यू, तर वरासह ८ प्रवासी गंभीर जखमी
13
Unclaimed Bank Deposits : बँकांमध्ये ७८,२१३ कोटी रुपये बेवारस पडून! सरकार प्रत्येक जिल्ह्यात वाटणार पैसे, काय आहे योजना?
14
बॉलिवूड अभिनेत्रीला स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, लेकीला अमेरिकेला पाठवलं; म्हणाली...
15
"हो, मी बाबा होणार आहे...", अरबाज खानने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "नर्व्हस आहेच..."
16
घरातून पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्यांना दणका, हायकोर्टाच्या आदेशानंतर नियमात बदल!
17
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
18
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
19
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
20
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."

अमेरिकेचे अध्यक्ष देवघरात, तेलंगणच्या शेतकऱ्याने पुजली डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2018 17:46 IST

शेतकरी दररोज ट्रम्प यांची साग्रसंगीत पूजा करतो

हैदराबाद- देशातील विविध नेत्यांचे पुतळे किंवा क्वचित ठिकाणी मंदिरं उभी राहिल्याचं तुम्ही पाहिलं असेल. तसेच सिने अभिनेत्यांनाही अगदी देवासारखं पुजल्याचं तुम्ही ऐकलं असेल. पण तेलंगणच्या एका शेतकऱ्याने चक्क अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाच देवघरात ठेवून पुजायला सुरुवात केली आहे.बुसा कृष्ण असे या शेतकऱ्याचे नाव असून तो तेलंगणच्या जानगांव जिल्ह्यातील कोण्णे या खेडेगावात राहातो. बुसा कृष्ण याने हिंदू देव-देवतांबरोबर डोनाल्ड ट्रम्प यांचीही प्रतिमा देवघरात ठेवली आहे. या प्रतिमेची दररोज हळदकुंकू, फुले वाहून पुजा केली जाते आणि ट्रम्पदेवाची आरती त्यांच्या घरी केली जाते.आंध्र प्रदेशातील श्रीनिवास कुचिभोटला यांची गेल्या वर्षी अमेरिकन नौदलातील एका निवृत्त कर्मचाऱ्याने हत्या केल्यानंतर ट्रम्प यांची पूजा करण्याचा विचार कृष्णाच्या मनात आला. अशी पूजा केल्यामुळेच ट्रम्प यांना भारतीयांचा मोठेपणा दिसून येईल असे त्यांचे मत आहे. त्यांच्याप्रती असणारे प्रेम आणि आपुलकी दिसून येण्यासाठी मी दररोज त्यांची पूजा व आरती करण्याचा निर्णय घेतलाय एकेदिवशी त्यांच्यापर्यंत माझी प्रार्थना पोहोचेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.आपल्या आध्यात्मिक ताकदीने भारतीय कोणावरही विजय मिळवू शकतात. एखाद्या शक्तीशाली माणसाचा तुम्ही थेट सामना करु शकत नाही. तुम्ही त्यांना प्रेम आणि उपासनेनेच जिंकू शकता, मी तेच करत आहे अशा शब्दांमध्ये कृष्णाने ट्रम्पउपासनेमागची कारणे सांगितली. असं सगळं असलं तरी कृष्णा यांना ट्रम्प यांच्याबद्दल फारसं माहिती नाही, ते एक शक्तीशाली नेते असून त्यांनी डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये सहभाग घेतला म्हणजे ते शक्तीशाली असणारंच असं मत कृष्णा यांनी व्यक्त केले आहे. (कृष्णा ट्रम्प यांना कुस्तीपटू समजत आहेत).दक्षिण भारतामध्ये एम. जी. रामचंद्रन तसेच जे. जयललिता यांची तामिळनाडूमध्ये अनेक मंदिरे असून त्यांना पुजले जाते. राजकोटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंदिर होते. मात्र त्यांनी त्याबाबत नाराजी व्यक्त केल्यावर ते बंद करण्यात आले. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पFarmerशेतकरीTelanganaतेलंगणा