शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
7
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
8
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
9
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
10
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
11
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
12
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
13
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
14
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
15
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
16
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
17
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
18
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
19
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
20
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा

५०० रूपयांत गॅस सिलिंडर, मोफत वीज अन् लग्नात सोनं आणि रक्कम; तेलंगणात काँग्रेसचं आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2023 17:43 IST

तेलंगणा विधानभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष आपली ताकद पणाला लावत आहेत.

Telangana Election 2023 Date : तेलंगणा विधानभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष आपली ताकद पणाला लावत आहेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी नेतेमंडळी राज्यभर दौरा करत असून घोषणांचा पाऊस पाहायला मिळत आहे. अशातच ३० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने शुक्रवारी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. जनतेचा कौल आपल्याकडे वळवण्यासाठी काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात ५०० रुपयांना एलपीजी सिलिंडर, मोफत वीज आणि मुलींच्या लग्नात सोने आणि रोख रक्कम देण्याची आश्वासने दिली आहेत. 

यावेळी मल्लिकार्जुन खर्गे यांनी तेलंगणा वेगळे राज्य करण्याबाबत काँग्रेस आणि सोनिया गांधी यांच्या भूमिकेचा देखील उल्लेख केला. "तेलंगणा राज्याची निर्मिती झाल्यानंतर खुर्चीवर कोण बसले, ज्याची काहीच भूमिका नव्हती. किती लोकांना गोळ्या लागल्या, किती लोक मृत्यृमुखी पडले. याचा फायदा जनतेला झाला नाही. राज्य निर्मितीचा फायदा सामान्य जनतेऐवजी खाणकाम आणि शेतीकऱ्यांना लुटणाऱ्या लोकांनाच झाला. यासाठी तेलंगणा नवीन राज्य करण्यात आले का?", असे मल्लिकार्जुन खर्गे यांनी नमूद केले.  

खर्गेंचा भाजपावर हल्लाबोलसत्ताधारी भाजपाला लक्ष्य करताना मल्लिकार्जुन खर्गे यांनी राम मंदिरावरून राजकारण सुरू असल्याचा आरोप केला. कर्नाटक निवडणुकीचा दाखला देताना खर्गेंनी म्हटले, "आम्ही ज्या पद्धतीने कर्नाटकातील जनतेला ५ आश्वासने दिली त्याच पद्धतीने तेलंगणातील जनतेला आम्ही आश्वासने देत आहोत. जी लोक प्रभू श्री राम यांच्या नावाने मतं मागत आहेत, त्यांनी जनतेसाठी काहीच केले नाही. काँग्रेस महिलांसाठी मोफत बस सुविधा पुरवणार आहे. बसमध्ये मोफत प्रवास करून महिलांना दररोज मंदिरात जाऊन दर्शन घेता येईल."

तेलंगणा निवडणुकीत काँग्रेसची आश्वासने 

  • गॅस सिलिंडर ५०० रूपयांत देणार. 
  • महिलांना बसमध्ये मोफत प्रवास.
  • २०० युनिटपर्यंत मोफत वीज देण्याचे आश्वासन.
  • इंदिराम्मा उपहार योजनेअंतर्गत हिंदूंना त्यांच्या मुलीच्या लग्नाच्या वेळी सरकारकडून १ लाख रुपये आणि १० ग्रॅम सोने दिले जाईल. त्याचबरोबर अल्पसंख्याकांना त्यांच्या मुलीच्या लग्नाच्या वेळी १ लाख ६० हजार रुपये दिले जातील.
  • उच्च शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक मुलीला मोफत स्कूटी देण्याचे आश्वासनही काँग्रेसने दिले. 

 

टॅग्स :TelanganaतेलंगणाElectionनिवडणूकcongressकाँग्रेस