शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या खात्यात येणारा पैसा राेखला, निवडणूक आयाेगाकडून BRS ला झटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2023 06:45 IST

Telangana Assembly Election:निवडणूक आयाेगाने तेलंगणामध्ये सत्ताधारी भारत राष्ट्र समितीला झटका दिला आहे. ‘रायथू बंधू’ याेजनेंतर्गत रब्बी पिकांसाठी शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या आर्थिक साहाय्यता निधीचा हप्ता वितरित करण्यास दिलेली परवानगी आयाेगाने मागे घेतली आहे.

नवी दिल्ली - निवडणूक आयाेगाने तेलंगणामध्ये सत्ताधारी भारत राष्ट्र समितीला झटका दिला आहे. ‘रायथू बंधू’ याेजनेंतर्गत रब्बी पिकांसाठी शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या आर्थिक साहाय्यता निधीचा हप्ता वितरित करण्यास दिलेली परवानगी आयाेगाने मागे घेतली आहे. पक्षाच्या नेत्यांकडून या याेजनेचा प्रचारात उल्लेख हाेत असून, हे आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचे आयाेगाने म्हटले आहे. आचारसंहिता लागू असेपर्यंत याेजनेंतर्गत काेणताही हप्ता जारी करण्यात येऊ नये, असे आयाेगाने आदेशात स्पष्ट केले आहे.राज्याचे अर्थमंत्री टी. हरीश राव यांनी एका प्रचारसभेत याबाबत जाहीर घाेषणा केली हाेती. तसेच पक्षाच्या इतर नेत्यांनीही प्रचारात पैसे खात्यात जमा हाेणार असल्याचा उल्लेख केला हाेता. आयाेगाने परवानगी देताना प्रचारात हा उल्लेख न करण्याचे स्पष्ट केले हाेते. यासंदर्भात काँग्रेसने दोन दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाकडे पत्र लिहून तक्रार  केली होती.

शेतकरी कदापि माफ करणार नाही : काॅंग्रेसबीआरएसचा बेजबाबदारपणा आणि संकुचित दृष्टिकाेनामुळे आयाेगाने निर्णय घेतला. बीआरएसने हे आणखी एक पाप केले असून, त्यांना शेतकरी कदापि माफ करणार नाहीत. हा पैसा शेतकऱ्यांच्या हक्काचा आहे, असे काँग्रेसचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगाेपाल यांनी सांगितले.

हे तर घाणेरडे राजकारण : कवितापरवानगी मागे घेण्यामागे काँग्रेससारख्या जुन्या पक्षाचे घाणेरडे राजकारण जबाबदार असल्याची टीका बीआरएसच्या नेत्या व आमदार के. कविता यांनी केली. शेतकऱ्यांनी परिस्थिती समजून घ्यावी आणि काँग्रेस शेतकऱ्यांचा शत्रू आहे, हे सत्य जाणून घ्यावे, असे कविता  यांनी सांगितले. 

काय म्हणाले हाेते हरीश राव?हरीश राव म्हणाले हाेते की, साेमवारी २७ नाेव्हेंबरला पैसे शेतकऱ्यांना मिळतील. शेतकऱ्यांचा चहा-नाष्टा हाेण्यापूर्वीच रक्कम त्यांच्या खात्यात जमा झालेली असेल. याच वक्तव्याची आयाेगाने दाखल घेतली हाेती. 

टॅग्स :telangana assembly electionतेलंगणा विधानसभा निवडणूक २०२३K Chandrashekar Raoके चंद्रशेखर रावBRS-Bharat Rashtra Samitiभारत राष्ट्र समितीcongressकाँग्रेस