शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

KCR यांना हरवून तेलंगणात काँग्रेसचा झेंडा फडकवणारा खासदार थेट मुख्यमंत्री बनणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2023 12:37 IST

आंध्र प्रदेशच्या काळात रेवंत रेड्डी कोडांगल येथून आमदार म्हणून विजयी झाले होते

हैदराबाद - तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत सुरुवातीच्या कलानुसार आता या राज्यात काँग्रेसचं सरकार येणार हे जवळपास निश्चित झालं आहे. काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी यांना मुख्यमंत्रिपदाचे प्रमुख दावेदार मानलं जाते. राज्यात विधानसभा निवडणुकीत रेवंत रेड्डी हे प्रचाराच्या केंद्रस्थानी होते. बीआरएस प्रमुखाला घेरण्यासाठी ते कोडांगल ते कामारेड्डी इथं निवडणुकीच्या प्रचारात उतरले होते. ५४ वर्षीय रेवंत रेड्डी तेलंगणात काँग्रेसची मोठी ताकद म्हणून पुढे आले आहेत. रेवंत रेड्डी हे सध्या लोकसभेचे खासदार आहेत. त्यामुळे रेवंत रेड्डी खासदार ते थेट मुख्यमंत्री बनण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत रेवंत रेड्डी सर्वात पुढे आहेत. 

आंध्र प्रदेशच्या काळात रेवंत रेड्डी कोडांगल येथून आमदार म्हणून विजयी झाले होते. २००९ आणि त्यानंतर २०१४ मध्ये ते टीडीपीच्या तिकीटावर निवडून आलेले रेवंत रेड्डी २०१८ च्या निवडणुकीत काँग्रेसमधून पराभूत झाले होते. त्यानंतर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं त्यांना मल्काजगिरी लोकसभेच्या जागेवरून उमेदवारी दिली. रेवंत रेड्डी यांनी मजबूतपणे या जागेवर यश मिळवले आणि लोकसभेत पोहचले.२०१८ च्या निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा त्यांनी घेतला. आता २०२३ च्या निवडणुकीत रेवंत रेड्डी यांनी केसीआर यांना धोबीपछाड दिला आहे. रेवंत रेड्डी यांच्या मेहनतीमुळे काँग्रेस पहिल्यांदाच राज्यात सरकार बनवत आहे. रेवंत रेड्डी यांनी अभाविपच्या माध्यमातून विद्यार्थी नेता म्हणून राजकारणाला सुरुवात केली. आता रेवंत रेड्डी हे तेलंगणाचे दुसरे मुख्यमंत्री बनण्याच्या तयारीत आहेत. 

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा निवडणूक निकालांच्या LIVE UPDATES साठी क्लिक करा!

टीडीपीतून काँग्रेसचा प्रवासए रेवंत रेड्डी यांचा जन्म ८ नोव्हेंबर १९६९ मध्ये झाला. आतापर्यंत ते आमदार, खासदार राहिले आहेत. २००९ आणि २०१४ यात ते आंध्र प्रदेश विधानसभा आणि २०१४ ते २०१८ यात तेलंगणा विधानसभेत तेलुगु देशम पार्टीचे कोडांगल मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. ऑक्टोबर २०१७ रोजी त्यांनी टीडीपीला रामराम करत काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. जून २०२१ मध्ये त्यांची तेलंगणा प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली. रेवंत रेड्डी महबूबनगर जिल्ह्यात राहणारे आहेत. त्यांनी उस्मानिया यूनिवर्सिटीतून पदवीचे शिक्षण घेतले. रेवंत रेड्डी यांच्या पत्नीचे नाव गीता आहे. त्या काँग्रेसचे दिग्गज नेते जयपाल रेड्डी यांच्या भाची आहेत.  

टॅग्स :telangana assembly electionतेलंगणा विधानसभा निवडणूक २०२३congressकाँग्रेसElectionनिवडणूक