शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

हा स्टुडियो उमेदवारांसाठी लकी; इथे फोटो काढल्यावर विजय नक्की

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2018 17:44 IST

उमेदवारी जाहीर होताच स्टुडियोत नेत्यांची गर्दी

हैदराबाद: निवडणूक जिंकण्यासाठी नेते मंडळी पूर्ण ताकद पणाला लावतात. निवडणूक अर्ज भरताना, प्रचार सुरू करताना मुहूर्त पाहणाऱ्या नेत्यांची संख्याही कमी नाही. तेलंगणादेखील अशा नेत्यांना अपवाद नाही. इथले अनेक नेते निवडणूक प्रचारासाठी आवश्यक असणारे फोटो एका स्टुडियोमध्ये काढतात. या स्टुडियोमध्ये फोटो काढल्यावर विजय नक्की असतो, असं अनेक नेते मानतात. तेलंगणातील बरकतपुरामध्ये अरुणा स्टुडियोमध्ये सध्या उमेदवारांची मोठी गर्दी आहे. अरुणा स्टुडियोमध्ये फोटो काढल्यावर निवडणुकीतील विजय पक्का होतो, असा विश्वास उमेदवारांना आहे. मुशरदबाद मतदारसंघातून काँग्रेसकडून उमेदवारी मिळाल्यावर अनिल कुमार यादव लगेच अरुणा स्टुडियोत पोहोचले. नामांकन अर्ज, बॅनर आणि प्रचार वाहनांवर लावायचे सर्व फोटो आपण याच स्टुडियोत काढल्याची माहिती यादव यांनी 'टाईम्स ऑफ इंडिया'शी बोलताना दिली.  अनिल यांचे वडील आणि जीएसएमसी काँग्रेस अध्यक्ष अंजन कुमार यादव यांनी 2004 आणि 2009 मध्ये सिकंदराबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. यावेळी त्यांनी याच स्टुडियोमध्ये फोटो काढले होते. या दोन्ही निवडणुका त्यांनी जिंकल्या होत्या. 'आता मी माझ्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेऊन प्रचारासाठी आवश्यक फोटो अरुणा स्टुडियोमध्ये काढले आहेत', असं अनिल यांनी सांगितलं. अनिल कुमार यादव यांच्यासोबतच काँग्रेस पक्षाच्या इतर उमेदवारांनीही तिकीट मिळताच अरुणा स्टुडियोत फोटोसेशन केलं. यामध्ये पोनम प्रभाकर (करीमनगर), चाडा व्यंकट रेड्डी (हुसनाबाद), पी. शंकर राव (शदनगर), के लक्ष्मण (मुशीराबाद), रामरेड्डी दामोदर रेड्डी (सूर्यपेट) आणि जी. सुनीता (एलर) यांचा समावेश आहे.  

टॅग्स :Telangana Assembly Election 2018तेलंगणा विधानसभा निवडणूक 2018congressकाँग्रेसElectionनिवडणूक