शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

जानवेधारी राहुल गांधींना मुस्लिमांचं दु:ख कधीच समजणार नाही,असदुद्दीन ओवेसींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2018 13:47 IST

एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे.

ठळक मुद्देराहुल गांधींवर असदुद्दीन ओवेसींचा निशाणा'राहुल गांधी पर्यटकाप्रमाणे तेलंगणाचा दौरा करताहेत' टीडीपी आणि काँग्रेस पाकिटमारांची जमात - ओवेसी

हैदराबाद - तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी 7 डिसेंबरला मतदान होणार आहे. प्रचाराच्या रिंगणात प्रत्येक राजकीय पक्ष कंबर कसून उतरले आहेत. सत्ताधारी पक्षावर बोचऱ्या शब्दांत टीका करण्यासाठी विरोधक अजिबात कसर सोडत नाहीयेत. एकूणच सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर चिखलफेक करण्यात सध्या व्यस्त आहेत. अशातच एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. मदरसे आणि मुस्लिमांची धार्मिक स्थळं बंद करण्याचा प्रयत्न सरू आहे आणि हे (सरकार) आपल्याला (मुस्लिमांना) पाहून घेऊ इच्छित नाहीत.    

सैदाबाद येथील जनसभेला संबोधित करताना असदुद्दीन ओवेसी यांनी हे विधान केले आहे. ओवेसी पुढे असंही म्हणाले की, AIMIMला हरवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार हैदराबादचा दौरा करत आहेत, तर दुसरीकडे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा केवळ पाच वेळाच येथे आले आहेत. उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालप्रमाणेच ते (सरकार) आपला (मुस्लिम) आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. 

(मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न विचारताच केसीआर यांनी काढला तरुणाचा बाप)

यावेळेस ओवैसींनी भाजपासह काँग्रेसवरही बोचऱ्या शब्दांत निशाणा साधला. तेलंगणातील काँग्रेस-टीडीपी-सीपीआय-तेलंगणा जन समिती या आघाडीवर हल्लाबोल चढवताना ओवेसी म्हणाले की, टीडीपी आणि काँग्रेसचा पाकिटमार असा उल्लेख केला. शिवाय, राहुल गांधी एखाद्या पर्यटकाप्रमाणे राज्याचा दौरा करत आहेत. जानवेधारी राहुल आमचे दुःख कधीच समजू शकणार नाहीत, असा हल्लाबोलही त्यांनी चढवला आहे. 

दरम्यान, तेलंगणा विधानसभा निवडणुकीतील 119 जागा निवडणुकीसाठी 7 डिसेंबर मतदान होणार आहे. यासाठी तेलंगणाचे के.चंद्रशेखरचे राव यांचा टीआरएस पक्ष आणि भाजपा स्वतंत्र निवडणुका लढवत आहेत.    

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीTelangana Assembly Election 2018तेलंगणा विधानसभा निवडणूक 2018