शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांच्या बैठकीत तेजस्वी यादव भावूक, म्हणाले, 'माझ्या जागी दुसऱ्या कोणाची तरी निवड करा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 13:48 IST

आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यादव आज आमदारांच्या बैठकीत भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. कुटुंबातील वादामुळे ते तणावात असल्याचे दिसून आले.

बिहार विधानसभा निवडणुकीत लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडी पक्षाचा मोठा पराभव झाला.पक्षाला झालेला पराभव पचवणे कठीण जात आहे. दरम्यान, काल पक्षाची बैठक झाली. या बैठकीत तेजस्वी यादव यांची राजद विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी पुन्हा निवड झाली.  या बैठकीत नाराजीचा सूर पाहायला मिळाला.  सोमवारी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत तेजस्वी यादव भावनिकही झाले. 'जर आमदारांची इच्छा असेल तर मी नेतृत्व सोडण्यास तयार आहेत. जर आमदारांचे मत असेल तर ते दुसऱ्या कोणाला तरी नेता म्हणून निवडू शकतात',असंही तेजस्वी यादव म्हणाले.

पालघर साधू हत्याकांडांतील आरोपांमुळे काशिनाथ चौधरी यांना अश्रू अनावर; "माझं राजकीय करियर..."

एका आमदाराने सांगितले की, तिकीट वाटप आणि पराभवाबाबतच्या आरोपांमुळे तेजस्वी यादव दुखावले आहेत. बैठकीदरम्यान त्यांनी असेही म्हटले की, "मी काय करावे? मी माझ्या कुटुंबाची काळजी घ्यावी की पक्षाची?" तेजस्वी यादव त्यांच्या बहिणी रोहिणी आचार्य यांनी केलेल्या आरोपांमुळे दबावाखाली असल्याचे दिसत आहे. तेजस्वी यादव यांनी अजूनही उघड उघड काहीही स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यांचे सल्लागार आणि जवळचे सहकारी, संजय यादव आणि रमीज नेमत खान यांच्यावरही आरोप आहेत. तेजस्वी यादव फक्त त्यांचेच ऐकतात, असा आरोपही त्यांच्यावर होत आहे.

बैठकीत भावूक वातावरण

तेजस्वी यादव यांच्या अचानक प्रस्तावामुळे भावनिक गोंधळ निर्माण झाला. उपस्थित सर्व आमदारांनी त्यांना त्यांचे नेते राहावे असा आग्रह धरला. लालू यादव यांनी स्वतः हस्तक्षेप केला आणि आमदारांना त्यांचे मन वळवण्यास सांगितले. त्यानंतर आमदारांनी एकमताने तेजस्वी यादव यांना त्यांचे नेते म्हणून निवडले. राबडी देवी, मीसा भारती आणि तेजस्वी यादव यांचे जवळचे सहकारी संजय यादव हे देखील यावेळी उपस्थित होते.

या निवडणुकीत पक्षाने १४३ जागा लढवल्या पण यामधील २५ जागांवर विजय मिळवला. आरजेडी तिसरा पक्ष ठरला आहे. हा पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

बैठकीत EVM वर प्रश्न 

याआधीही बिहारमध्ये असा निकाल आला होता. २०१० मध्ये आरजेडीला फक्त २२ जागा मिळाल्या होत्या. पण यावेळी त्यावेळी त्यांना विरोधी पक्षनेतेपदही मिळवता आले नाही. या बैठकीत जगदानंद सिंह म्हणाले की, ईव्हीएम त्यांच्या पराभवाचे कारण आहे. या मशीनचा गैरवापर झाला. आमदार भाई वीरेंद्र यांनीही या दाव्याचे समर्थन केले.आपण ईव्हीएमविरुद्ध लढले पाहिजे. आपण फक्त मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्याची मागणी केली पाहिजे, असंही सिंह या बैठकीत म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Tejashwi Yadav offers to resign amid RJD defeat fallout.

Web Summary : Following RJD's Bihar defeat, Tejashwi Yadav offered to step down as leader during a party meeting amid accusations of flawed ticket distribution. Yadav cited family concerns and pressure from accusations against his advisors. Party members urged him to stay, with Lalu Yadav intervening to ensure his continued leadership.
टॅग्स :Bihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५Electionनिवडणूक 2024Biharबिहार