शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

तेजस्वी यादव यांच्या ताफ्यातील गाडीचा भीषण अपघात; चालकाचा मृत्यू, 10 जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2024 10:01 IST

Tejashwi Yadav : अपघातात वाहनाचा चालक मोहम्मद हलीम याचा जागीच मृत्यू झाला. तर 6 पोलीस जखमी झाले आहेत.

तेजस्वी यादव यांच्या ताफ्यातील एका वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. पूर्णियातील मुफसिल पोलीस ठाण्याच्या बेलौरीजवळ हा अपघात झाला. या अपघातात वाहनाचा चालक मोहम्मद हलीम याचा जागीच मृत्यू झाला. तर 6 पोलीस जखमी झाले आहेत. याशिवाय दुसऱ्या कारमध्ये प्रवास करणारे चार नागरिकही जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

सर्व 10 जखमींना उपचारासाठी तातडीनने GMCH मध्ये दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. माहिती मिळताच एसपी उपेंद्रनाथ वर्मा जीएमसीएचमध्ये पोहोचले आणि त्यांनी डॉक्टरांना सर्व जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना दिल्या. एसपी उपेंद्रनाथ वर्मा यांनी सांगितले की, एस्कॉर्ट वाहन आणि कारमध्ये टक्कर झाली. ज्यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे तर 6 पोलिसांसह अनेक नागरिक जखमी झाले आहेत. 

जनविश्वास यात्रेदरम्यान तेजस्वी यादव यांचा ताफा पूर्णियातील बेलौरी येथून जात होता, असे सांगण्यात येत आहे. या वाहनाचाही या ताफ्यात समावेश होता. पूर्णिया कटिहार चार लेन रोडवर गाडी चुकीच्या बाजूला गेली. त्यामुळे कटिहारकडून येणाऱ्या लाल रंगाच्या कारची जोरदार धडक झाली. ज्यामध्ये ही मोठी दुर्घटना घडली आहे.

घटनेची माहिती मिळताच मृताच्या कुटुंबीयांनीही रुग्णालयात धाव घेतली. मृताची पत्नी आणि तिच्या कुटुंबीयांची अवस्था अत्यंत वाईट आहे. तेजस्वी यादव पूर्णिया, अररिया, किशनगंजच्या जनविश्वास यात्रेसाठी आले होते. रात्री साडेदहाच्या सुमारास ते पूर्णियाहून कटिहारकडे जात होते. तेव्हा हा अपघात झाला आहे. 

टॅग्स :Tejashwi Yadavतेजस्वी यादवAccidentअपघात