तीस्ता सेटलवाड यांना गुरुवारपर्यंत दिलासा
By Admin | Updated: February 14, 2015 00:46 IST2015-02-14T00:46:50+5:302015-02-14T00:46:50+5:30
गुजरात दंगलीत बेचिराख झालेल्या गुलबर्ग सोसायटीच्या जागी संग्रहालय उभारण्यासाठी गोळा करण्यात आलेल्या निधीत अपहार

तीस्ता सेटलवाड यांना गुरुवारपर्यंत दिलासा
नवी दिल्ली : गुजरात दंगलीत बेचिराख झालेल्या गुलबर्ग सोसायटीच्या जागी संग्रहालय उभारण्यासाठी गोळा करण्यात आलेल्या निधीत अपहार केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड यांना सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी पुन्हा दिलासा दिला़ १९ फेबु्रवारीपर्यंत तिस्ता आणि त्यांच्या पतीला अटक करण्यात येऊ नये, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले़
आम्ही एफआयआर रद्द करणार नाही़ केवळ एफआयआरच्या आधारावर आम्ही या प्रकरणाची स्वतंत्रपणे पडताळणी करू आणि त्यानंतर तीस्ता आणि त्यांच्या पतीला अटकपूर्व जामीन देण्याबाबत निर्णय घेऊ, असे सर्वोच्च न्यायालयाचे न्या़ एस़जे़ मुखोपाध्याय आणि न्या़ एऩव्ही़ रमण यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले़ सुमारे अर्ध्या तासाच्या सुनावणीनंतर न्यायालयाने संबंधित प्रकरणाची सुनावणी १९ फेबु्रवारीपर्यंत स्थगित केली़ तोपर्यंत काल दिलेला अंतरिम संरक्षणाचा आदेश प्रभावी राहील, असे न्यायालयाने सांगितले, तसेच संबंधित पक्षांना गुजरात उच्च न्यायालयाचा निर्णय आणि अतिरिक्त दस्तऐवज सादर करण्याचे निर्देश दिले़ (लोकमत न्यूज नेटवर्क)