शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

सिनेमाची कॉपी करत तरूणाने 5 वर्षाच्या चिमुरडीचं अपहरण करून केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2017 11:21 IST

सोप्या पद्धतीने पैसे कमाविण्यासाठी एका सोळा वर्षाच्या तरूणाने पाच वर्षाच्या चिमुरडीचं अपहरण केल्याची घटना घडली आहे.

ठळक मुद्देसोप्या पद्धतीने पैसे कमाविण्यासाठी एका सोळा वर्षाच्या तरूणाने पाच वर्षाच्या चिमुरडीचं अपहरण केल्याची घटना घडली आहे. आरोपी तरूणाने चिमुरडीचं अपहरण करून पाण्याने भरलेल्या बादलीत बुडवून तिची हत्या केली.

अंबाला- सिनेमात एखाद्याचं अपहरण करून त्यांच्या कुटुंबीयांकडून पैसे मागितल्याचे सिन दाखविले जातात. कमी वेळात जास्त पैसा मिळवून देणारी सोपी पद्धत असं काहीसं अपहरणाचं काल्पनिक वर्णन सिनेमातून केलं जातं. पण अनेक जण सिनेमातील काल्पनिक दृश्यांचं खऱ्या आयुष्यात अनुकरण करताना दिसताना. असाच एक प्रकार अंबालामध्ये घडला आहे. सोप्या पद्धतीने पैसे कमाविण्यासाठी एका सोळा वर्षाच्या तरूणाने पाच वर्षाच्या चिमुरडीचं अपहरण केल्याची घटना घडली आहे. गुरूवारी या तरूणाला चिमुरडीचं अपहरण करून तिची हत्या केल्या प्रकरणी अटक झाली. आरोपी तरूणाने चिमुरडीचं अपहरण करून पाण्याने भरलेल्या बादलीत बुडवून तिची हत्या केली. त्यानंतर त्याने चिमुरडीचा मृतदेह त्याच्या घरातील कुलरमध्ये लपवून ठेवला. 

अपहरण व हत्येचा गुन्हा करायाला सिनेमाच्या सिन्समुळे प्रवृत्त झालो होतो. सोप्या पद्धतीने पैसे कमावण्यासाठी हा गुन्हा केल्याची, अशी कबूली आरोपी मुलाने पोलिसांसमोर दिली आहे. पाच वर्षाच्या चिमुरडीचं अपहरण करून तिच्या वडिलांकडे 20 लाख रूपयांची मागणी केली होती. चिमुरडीच्या वडिलांचं अंबालातील गावात फोटो स्टुडिओ आहे. पोलीस आपल्या मागावर असल्याचं तरूणाला समजल्यावर त्याने चिमुरडीचं हत्या केली. 

चिमुरडीच्या वडिलांनी त्यांचं दुसरं घर आरोपी मुलाच्या मेहुण्याला भाड्याने दिलं होतं. घटनेच्या वेळी आरोपी मुलगा त्या घरात एकटा होता. त्याचं कुटुंबीय उत्तर प्रदेशला गेलं होतं. चिमुरडीचे वडील आरोपी मुलाला रोजचं जेवण व इतर गोष्टी पुरवत होते. आरोपी हा अंबाला सरकारी शाळेत अकरावीत शिक्षण घेतो आहे.

चिमुरडी बुधवारी घराजवळ खेळत असताना आरोपी तरूणाने तिचं अपहरण केलं.  मुलगी हरविल्याची तक्रार करताना मुलीच्या वडिलांना खंडणीसाठी फोन आला. पोलिसांनी तो फोन कॉल ट्रेस केला व मुलाचं घर गाठलं. केलेल्या गुन्ह्याचा मुलाला जराही पश्चाताप नव्हता. पोलीस जेव्हा आरोपी मुलाच्या घरी गेले तेव्हा तो शांतपणे लॅपटॉपवर काम करत होता, अशी माहिती पोलीस अधिकारी अभिषेक जोरवाल यांनी दिली आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाKidnappingअपहरणMurderखून