ट्विटरच्या वेबसाईटला तांत्रिक बिघाड
By Admin | Updated: January 19, 2016 19:40 IST2016-01-19T19:13:44+5:302016-01-19T19:40:06+5:30
सोशल मीडियात लोकप्रिय असलेली ट्विटर ही वेबसाईट काही तांत्रिक झाल्याचे बंद झाली आहे. यामुळे ट्विटरच्या लाखो युजर्संना फटका बसला आहे.

ट्विटरच्या वेबसाईटला तांत्रिक बिघाड
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १९ - सोशल मीडियात लोकप्रिय असलेली ट्विटर ही वेबसाईट काही तांत्रिक बिघाड झाल्याने बंद झाली आहे. यामुळे ट्विटरच्या लाखो युजर्संना फटका बसला आहे.
ट्विटरचे मोबाईल अप आणि वेबसाईट दोन्हीही क्रॅश झाले असून ट्विटरच्या वेबसाईटला भेट दिल्यास स्क्रीनवर आपल्या एक संदेश मिळतो. काहीतरी तांत्रिक दोष असून लवकरच आम्ही तो दूर करू असा, संदेश देण्यात आला आहे.
ट्विटरवर असा तांत्रिक बिघाड दुस-यांदा झाला आहे. काल सुद्धा लाखो युजर्संनी ट्विटरला भेट दिल्याने ट्विटरची वेबसाइट क्रॅश झाली होती.