देशांतर्गत विमानसेवेत तांत्रिक समस्या

By Admin | Updated: June 8, 2015 02:39 IST2015-06-08T02:39:22+5:302015-06-08T02:39:22+5:30

देशांतर्गत (डोमेस्टिक) विमानसेवेला सध्या तांत्रिक समस्यांनी ग्रासले आहे. तांत्रिक अडचणींमुळे मोठ्या प्रमाणात विमानसेवा रद्द होत आहेत.

Technical problems in domestic aircrafts | देशांतर्गत विमानसेवेत तांत्रिक समस्या

देशांतर्गत विमानसेवेत तांत्रिक समस्या

मुंबई : देशांतर्गत (डोमेस्टिक) विमानसेवेला सध्या तांत्रिक समस्यांनी ग्रासले आहे. तांत्रिक अडचणींमुळे मोठ्या प्रमाणात विमानसेवा रद्द होत असून, जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत तांत्रिक अडचणी वाढल्याचे डीजीसीएच्या अहवालातून समोर आले आहे. यात सर्वाधिक तांत्रिक अडचणींचा सामना स्पाइस जेट, जेट लाइट, एअर इंडिया या विमान कंपन्यांना करावा लागत
आहे.
स्पाइस जेट, जेट लाइट, एअर इंडिया, एअर एशिया, जेट एअरवेज, एअर कोस्टा, गो एअर, विस्टारा आणि इंडिगो अशा देशांतर्गत सेवा देणाऱ्या विमान कंपन्या आहेत. या कंपन्यांनी दिलेल्या सेवेमुळे जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत २५१.0५ लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे. २0१४ च्या सुरुवातीच्या चार महिन्यांत तुलना केली असता २१.२८ टक्के त्यात वाढ आहे. मात्र ही वाढ जरी असली तरी अनेक कारणांमुळे विमान सेवा रद्द होत असून, त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रासही सोसावा लागत आहे. तांत्रिक, चालन प्रक्रिया, हवामानातील बिघाड आणि अन्य छोट्या कारणांमुळे विमान सेवा रद्द होत असून, यात तांत्रिक बिघाडाचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे डीजीसीएच्या अहवालातून समोर आले आहे. २0१५ च्या जानेवारी १३.५ टक्के तांत्रिक कारणामुळे देशांतर्गत विमान सेवा रद्द झाल्या होत्या. मात्र फेब्रुवारी महिन्यात हेच प्रमाण पाहिले असता तब्बल ४८.२ टक्के झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्याचप्रमाणे बदलत्या हवामानाचा फटकाही विमान सेवांना बसत आहे. जानेवारी महिन्यात ६६ टक्के हवामानातील बिघाडामुळे विमान सेवा रद्द झाल्या होत्या. एप्रिल महिन्यात हेच प्रमाण १९ टक्के झाल्याचे समोर आले आहे. (प्रतिनिधी)

2015च्या जानेवारी महिन्यात स्पाइस जेट कंपनीच्या सेवा रद्द होण्याचे प्रमाण हे सर्वाधिक ३.७५ टक्के एवढ होते. त्यानंतर जेट लाइट, एअर इंडिया यांचे आहे.

च्फेब्रुवारी महिन्यात विस्टारा कंपनीच्या सेवा रद्द होण्याचे सर्वाधिक प्रमाण २.२८ टक्के एवढे आहे. त्यानंतर जेट लाइट, एअर एशियाचा नंबर लागतो.
च्मार्च महिन्यात स्पाइस जेट कंपनीच्या विमान सेवा रद्द होण्याचे प्रमाण १.८९ टक्के एवढे असून, त्यानंतर एअर इंडिया, एअर एशिया यांचा नंबर लागतो.
च्एप्रिल महिन्यात एअर कोस्टा कंपनीच्या विमान सेवा रद्द होण्याचे प्रमाण सर्वाधिक ४.८५ टक्के एवढे आहे. त्यानंतर एअर इंडिया, जेट एअरवेज यांचा नंबर लागतो.

Web Title: Technical problems in domestic aircrafts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.