शहरं
Join us  
Trending Stories
1
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
2
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
3
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
4
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
5
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
6
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
7
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
8
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
9
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
10
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
11
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
12
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
आईचे दुसऱ्या महिलेशी समलैंगिक संबंध, प्रेमासाठी चिमुकल्याची हत्या; पतीच्या हाती लागला व्हिडिओ अन् मग...
14
कधीकाळी चालवायचे रिक्षा, आता मुलाच्या वाढदिवशी लग्झरी कार दिली भेट; VIP नंबरसाठी मोजले ३१ लाख
15
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
16
तुमच्या कारमधील परफ्यूम दरवळतोय पण ठरतोय 'सायलेंट किलर'! श्वास आणि मायग्रेनचा गंभीर धोका
17
Nuclear warfare: भविष्य स्फोटक आहे...
18
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
19
अर्धा तास तडफडला! फी न भरल्याने प्राध्यापकाने केला अपमान, विद्यार्थ्याने कॅम्पसमध्ये स्वतःला पेटवले
20
"तुमच्यातले शारीरिक संबंध कसे आहेत?", आंतरधर्मीय लग्न करताना मराठी गायिकेला आईने विचारलेला बोल्ड प्रश्न

तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 18:25 IST

सध्या न्यूयॉर्कमध्ये सुरू असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या बैठकीमध्ये एक अजब घटना घडली आहे. संयुक्त राष्ट्रांमध्ये पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ बोलणाऱ्या नेत्यांचे माईक अचानक बंद होण्याचा प्रकार वारंवार घडला.

सध्या न्यूयॉर्कमध्ये सुरू असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या बैठकीमध्ये एक अजब घटना घडली आहे. संयुक्त राष्ट्रांमध्ये पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ बोलणाऱ्या नेत्यांचे माईक अचानक बंद होण्याचा प्रकार वारंवार घडला. एक दोन वेळा नाही तर चार नेत्यांच्या भाषणादरम्यान हा प्रकार घडला. दरम्यान, संयुक्त राष्ट्रांनी हा प्रकार तांत्रिक बिघाडामुळे झाल्याचे सांगितले आहे. मात्र पॅलेस्टाइनच्या उल्लेखादरम्यानच हा प्रकार घडल्यामुळे मोसादचं नाव चर्चेत आलं आहे.

सुरुवातीला इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींनी गझामध्ये शांती सैना तैनात करण्याचा विषय काढल्यावर त्यांचा माईक बंद झाला. त्यानंतर तुर्कीएचे राष्ट्रपती रेचेप तैयप एर्दोगन यांच्यासोबत असाच प्रकार घडला. जेव्हा त्यांनी हमासला दहशतवादी संघटना न मानण्याचा आणि पॅलेस्टाइनला पाठिंबा देण्याचा विषय काढला तेव्हा अचानक त्यांचा आवाज बंद झाला.

एवढंच नाही तर कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी जेव्हा पॅलेस्टाइन आणि दोन देशांमधील तोडग्याबाबत बोलले तेव्हा सुरवातीला त्यांचं भाषण सामान्य होते. मात्र पॅलेस्टाइनला मान्यत देण्याचा विषय काढताच त्यांचा माईक बंद झाला. तसेच काही मिनिटांत हॉलमध्ये शांतता पसरली. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती सिरील रामाफोसा यांच्यासोबत असाच प्रकार घडला. त्यांनी पॅलेस्टाइनचा मुद्दा  उपस्थित करताच माईक बंद झाला.

आता संयुक्त राष्ट्रांनी तांत्रिक बिघाडामुळे हा प्रकार घडल्याचे सांगितले आहे. मात्र एकच प्रकार वारंवार घडल्याने हा खरोखरच तांत्रिक बिघाड होता की त्यामागे अन्य कुणाचा हात होता असा प्रश्न उपस्थित होत आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : UN: Technical Glitch or Mossad? Palestine Talk, Mics Cut Off!

Web Summary : At the UN, mics of leaders supporting Palestine mysteriously cut off during speeches. UN cites technical issues, but suspicion falls on Mossad due to the timing. Leaders from Indonesia, Turkey, Canada, and South Africa were affected when discussing Palestine.
टॅग्स :United StatesअमेरिकाInternationalआंतरराष्ट्रीयIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष