शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

चेन्नई विमानतळावरच्या पुलावरून पडून एका व्यक्तीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2018 16:52 IST

चेन्नई विमानतळावरच्या पुलावरून पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. बंगळुरूतल्या एका आयटी कंपनीत टेक्निशियन म्हणून कार्यरत असलेल्या व्यक्तीचा चेन्नई विमानतळावरच्या पुलावरून पडून अंत झाला आहे.

तामिळनाडू- चेन्नई विमानतळावरच्या पुलावरून पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. बंगळुरूतल्या एका आयटी कंपनीत टेक्निशियन म्हणून कार्यरत असलेल्या व्यक्तीचा चेन्नई विमानतळावरच्या पुलावरून पडून अंत झाला आहे. सोमवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली आहे.आंध्र प्रदेशमधल्या विजयवाडाचा रहिवासी असलेला चैतन्य हा देशांतर्गत प्रवास करण्यासाठी चेन्नई विमानतळावर आला असता, निष्काळजीपणामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. एका प्रत्यक्षदर्शीनं पोलिसांना सांगितलं की, चैतन्य हा विमानतळावरील पुलाच्या रेलिंगवर बसला होता. त्या रेलिंगवरूनच त्याचा तोल जाऊन तो खाली पडला. तो व्यक्ती एकतर सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत असावा किंवा रेलिंगवर बसला असावा, असं सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून समजतं आहे.त्या उड्डाणपुलाचा वापर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रवाशांना सोडण्यासाठी केला जातो. त्यामुळे त्या व्यक्तीनं आत्महत्या तर केली नाही ना, याचा पोलीस तपास करत आहेत. चैतन्य हा हाडांच्या विकारानं ग्रस्त होता. तसेच त्याच्याजवळ कोणतीही बॅग अथवा तिकीट नव्हते. कदाचित त्याच्या आयफोनमध्ये ई-तिकीट असावी. परंतु या दुर्घटनेत त्याचा अॅपलचा आयफोन फुटला आहे.

टॅग्स :Chennaiचेन्नईAirportविमानतळ