शशिकलांना अश्रू अनावर

By Admin | Updated: February 14, 2017 22:58 IST2017-02-14T22:58:18+5:302017-02-14T22:58:18+5:30

तामिनाडूमध्ये सुरू असलेले राजकीय नाट्य क्षणाक्षणाला नवनवे वळण घेत आहे. आज सकाळी सर्वोच्च

Tears tears to the Shishikas | शशिकलांना अश्रू अनावर

शशिकलांना अश्रू अनावर

ऑनलाइन लोकमत 
चेन्नई, दि. 14 -  तामिनाडूमध्ये सुरू असलेले राजकीय नाट्य क्षणाक्षणाला नवनवे वळण घेत आहे.  आज सकाळी सर्वोच्च न्यायालयाने भ्रष्टाचाराच्या प्रकरणात शिक्षा सुनावल्याने मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून बाद झालेल्या शशिकला यांना रात्री आमदारांना संबोधित करताना अश्रू अनावर झाले.  दरम्यान शशिकला यांनी गोल्डन बे रिसॉर्ट सोडला आहे. आता त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. 
 भावूक झालेल्या शशिकला म्हणाल्या, मला कुणीही अण्णा द्रमुकपासून वेगळे करू शकत नाही.  मग मी कुठेही असले तरी मी नेहमीच पक्षाचा विचार करेन. अडचणीत असतानाही आमदारांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे मी समाधानी आहे.  सरकार स्थापन करण्यासाठी आम्हाला राज्यपालांकडून निमंत्रण मिळेल अशी अपेक्षा आहे."    

Web Title: Tears tears to the Shishikas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.