बिहारमधील पराभवासाठी संघ जबाबदार नाही - संघ
By Admin | Updated: November 8, 2015 20:46 IST2015-11-08T20:46:11+5:302015-11-08T20:46:11+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही राजकीय संघटना नसल्याने बिहारमधील भाजपाच्या पराभवासाठी संघाला जबाबदार धरता येणार नाही असे स्पष्टीकरण संघाचे नेते मनमोहन वैद्य यांनी दिले आहे.

बिहारमधील पराभवासाठी संघ जबाबदार नाही - संघ
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. ८ - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही राजकीय संघटना नसल्याने बिहारमधील भाजपाच्या पराभवासाठी संघाला जबाबदार धरता येणार नाही असे स्पष्टीकरण संघाचे नेते मनमोहन वैद्य यांनी दिले आहे. महाआघाडीला ऐवढा मोठा विजय मिळेल अशी आशा नव्हती असेही त्यांनी म्हटले आहे.
बिहारमध्ये भाजपाच्या पराभवासाठी सरसंघचालक मोहन भागवत यांचे आरक्षणासंदर्भातील विधान कारणीभूत असल्याची चर्चा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर संघाचे नेते मनमोहन वैद्य यांनी हे आरोप फेटाळून लावल्याचे इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. राहुल गांधी यांनी काँग्रेस संघाचा फक्त पराभवच करणार नाही तर त्यांना ठेचून पुढे जाईल असे म्हटले होते. यावरुनही वैद्य यांनी राहुल गांधींवर टीका केली. राहुल गांधींच्या विधानातून काँग्रेसची असहिष्णूता दिसत असून आम्ही अशा भाषेचा निषेध करतो असे वैद्य यांनी म्हटले आहे.