‘अध्यापन हा पेशा नव्हे, तर जीवनमार्ग’
By Admin | Updated: September 5, 2014 03:14 IST2014-09-05T03:14:32+5:302014-09-05T03:14:32+5:30
अध्यापन हा पेशा नसून तो एक जीवनमार्ग आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला येथे व्यक्त केले.

‘अध्यापन हा पेशा नव्हे, तर जीवनमार्ग’
नवी दिल्ली : अध्यापन हा पेशा नसून तो एक जीवनमार्ग आहे असे सांगून शिक्षकांचे हे प्रयत्न भारताच्या भविष्याच्या निर्मितीला प्रोत्साहन देणारे ठरतील असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला येथे व्यक्त केला.
शिक्षकदिनानिमित्त राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते गौरवान्वित केल्या जाणा:या 35क् शिक्षकांना आपल्या निवासस्थानी आमंत्रित करून पंतप्रधानांनी त्यांच्याशी अनौपचारिक चर्चा केली. गुजरातचे मुख्यमंत्रिपद पहिल्यांदा मिळाले तेव्हा आपल्याला, लहानपणीच्या मित्रंना भेटण्याची व ज्यांनी शिकवले त्या सर्व शिक्षकांना भेटण्याची इच्छा झाल्याचे मोदी यावेळी म्हणाले. या दोन्ही इच्छा पूर्ण झाल्याचे सांगून, विद्याथ्र्याच्या जीवनात त्याच्या शिक्षकांची भूमिका ही महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)