शिक्षण बीकॉम; काम कचरा उचलण्याचे
By Admin | Updated: May 9, 2017 00:47 IST2017-05-09T00:47:15+5:302017-05-09T00:47:15+5:30
या व्यक्तीचे शिक्षण आहे बीकॉमपर्यंत. १४ वर्षे त्यांनी नोकरीही केली. सध्या ते दिल्लीतील कचरा उचलण्याचे काम करतात.

शिक्षण बीकॉम; काम कचरा उचलण्याचे
नवी दिल्ली : या व्यक्तीचे शिक्षण आहे बीकॉमपर्यंत. १४ वर्षे त्यांनी नोकरीही केली. सध्या ते दिल्लीतील कचरा उचलण्याचे काम करतात. वाचून कदाचित आश्चर्य वाटेल; पण नाइलाज म्हणून नव्हे तर, त्यांनी मुद्दाम हे काम निवडले आहे. दिल्ली स्वच्छ करणे हे आपले ध्येय असल्याचे ते सांगतात. उच्च शिक्षण, दोन-तीन भाषांचे ज्ञान, इंग्रजीही फाडफाड बोलतात. स्वच्छतेबाबत फक्त संदेश न देता स्वत:च काम करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि कामाला सुरुवात केली. याबाबत त्यांना विचारणा केली असता ते म्हणतात की, लोक फक्त विचारच करतात, त्यामुळे मी थेट कृती सुरू केली. कचरा उचलण्यासाठी त्यांची जेव्हा मुलाखत घेण्यात आली तेव्हा त्यांनी सांगितले की, या माध्यमातून मी देशसेवा करणार आहे. यातून मिळणाऱ्या पैशांवरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो.