शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या (पट्टा)
By Admin | Updated: February 14, 2015 01:07 IST2015-02-14T01:07:05+5:302015-02-14T01:07:05+5:30
शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या (पट्टा)
श क्षकाची गळफास घेऊन आत्महत्याधुळे : शिक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना देवपूरातील विद्यानगरी परिसरात शुक्रवारी पहाटे उघडकीस आली़ या शिक्षकाच्या खिशात चिठ्ठी सापडली असून, त्यात शाळेतीलच तीन जणांची नावे आहेत. देवपूर पोलिसात या प्रकरणी प्रथमदर्शी अकस्मात मृत्यूची नांेद करण्यात आली आहे़ सुकलाल राघो मुसळदे (३९) असे शिक्षकाचे नाव आहे़ ते विद्यानगरी परिसरातील श्री एकविरादेवी विद्यालयात शिक्षक म्हणून नोकरीला होते़ त्यांनी राहत्या घरी दुसर्या मजल्यावर सिमेंटच्या जाळीला दोर बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली़ सुकलाल मुसळदे यांच्या खिशात चिठ्ठी सापडली आहे़ तपासानंतर काय ते समोर येईल़, अशी माहिती पोलीस निरीक्षक रमेशसिंग परदेशी यांनी दिली. (प्रतिनिधी)