वेतन व इतर बिलांसाठी शिक्षकांचा घंटानाद

By Admin | Updated: May 5, 2014 20:56 IST2014-05-05T20:56:39+5:302014-05-05T20:56:39+5:30

नाशिक : जिल्‘ातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे वेतन अद्यापपर्यंत झालेले नसल्याने व वैद्यकीय बिलांसह अन्य बिले रखडल्याने महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक व शिक्षकेतर सेनेच्या वतीने माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले.

Teachers' Hours for Pay and Other Bills | वेतन व इतर बिलांसाठी शिक्षकांचा घंटानाद

वेतन व इतर बिलांसाठी शिक्षकांचा घंटानाद

शिक : जिल्‘ातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे वेतन अद्यापपर्यंत झालेले नसल्याने व वैद्यकीय बिलांसह अन्य बिले रखडल्याने महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक व शिक्षकेतर सेनेच्या वतीने माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले.
शिक्षकांचे ऑनलाइन वेतन होणार असल्याने त्यासाठी शालार्थ वेतन प्रणाली लागू करण्यात आली असून, त्यामुळे वेतन रखडल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे भविष्य निर्वाह वेतन पथक कार्यालयाकडे जिल्‘ातील अनेक शिक्षकांनी वैद्यकीय देयके, फरक देयके, पुरवणी देयके, तसेच भविष्य निर्वाह निधी प्रकरणांचा परतावा व ना परतावा असे अनेक प्रस्ताव असून, काही प्रकरणे ज्येष्ठता यादी डावलून दुसर्‍या मार्गाने मंजूर करण्याची किमया माध्यमिक शिक्षण विभागातील संबंधित पथकाकडून करण्यात येत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी नवनाथ औताडे यांच्या कार्यालयाबाहेर संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी घंटानाद आंदोलन केले. यावेळी मनसे शिक्षक सेनेचे राज्य सरचिटणीस प्रकाश सोनवणे, पुरुषोत्तम रकीबे, रघुनाथ हळदे यांच्यासह सखाराम जाधव, वासुदेव बधान, दशरस जारस आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
फोटो कॅप्शन-
०५ पीएचएएम-१०१- शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाबाहेर घंटानाद आंदोलन करताना महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक व शिक्षकतेर सेनेचे पदाधिकारी.

Web Title: Teachers' Hours for Pay and Other Bills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.