पाणी मारताना बांधकामावरुन पडल्याने शिक्षकाचा मृत्यू
By Admin | Updated: April 25, 2016 00:27 IST2016-04-25T00:27:20+5:302016-04-25T00:27:20+5:30
जळगाव: बांधकाम सुरु असलेल्या घरावर पाणी मारत असताना तेथून तोल जावून खाली पडल्याने जावेद हसन शेख (वय ४५ रा.अक्सा नगर) या शिक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी बारा वाजता मेहरुणमधील अक्सा नगरात घडली. जावेद यांचे नवीन घर बांधकाम सुरु आहे. दुपारी ते घरावर चढून भिंतीला पाणी मारत असताना अचानक त्यांचा तोल गेल्याने ते खाली पडले. यात त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागून जागेवरच बेशुध्द झाले. नातेवाईकांनी त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. जावेद हे शिरसोली येथे शिक्षक होते. जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी डॉ.पटेल यांच्या माहितीवरुन एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पाणी मारताना बांधकामावरुन पडल्याने शिक्षकाचा मृत्यू
ज गाव: बांधकाम सुरु असलेल्या घरावर पाणी मारत असताना तेथून तोल जावून खाली पडल्याने जावेद हसन शेख (वय ४५ रा.अक्सा नगर) या शिक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी बारा वाजता मेहरुणमधील अक्सा नगरात घडली. जावेद यांचे नवीन घर बांधकाम सुरु आहे. दुपारी ते घरावर चढून भिंतीला पाणी मारत असताना अचानक त्यांचा तोल गेल्याने ते खाली पडले. यात त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागून जागेवरच बेशुध्द झाले. नातेवाईकांनी त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. जावेद हे शिरसोली येथे शिक्षक होते. जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी डॉ.पटेल यांच्या माहितीवरुन एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.