चार शिक्षकांनी मारल्याने दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या जमावाचा हल्ला : शाळेचा कॅमेरा फोडल्याने शिक्षक झाले होते संतप्त
By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:16+5:302015-02-18T00:13:16+5:30
अहमदाबाद : बनासकांठा जिल्ातील गायत्री विद्यालयामध्ये दहावीत शिकत असलेल्या प्रकाश चौहान या १६ वर्षांच्या विद्यार्थ्याने शाळेचा कॅमेरा फोडल्यामुळे चार शिक्षकांनी बेदम चोप दिल्यानंतर आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले. त्यानंतर त्याच्या पालकासह जमावाने शाळेत घुसून मालमत्तेची नासधूस केल्यामुळे तणाव निर्माण झाला होता.

चार शिक्षकांनी मारल्याने दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या जमावाचा हल्ला : शाळेचा कॅमेरा फोडल्याने शिक्षक झाले होते संतप्त
अ मदाबाद : बनासकांठा जिल्ह्यातील गायत्री विद्यालयामध्ये दहावीत शिकत असलेल्या प्रकाश चौहान या १६ वर्षांच्या विद्यार्थ्याने शाळेचा कॅमेरा फोडल्यामुळे चार शिक्षकांनी बेदम चोप दिल्यानंतर आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले. त्यानंतर त्याच्या पालकासह जमावाने शाळेत घुसून मालमत्तेची नासधूस केल्यामुळे तणाव निर्माण झाला होता. सोमवारी या विद्यार्थ्याला मारहाण करण्यापूर्वी शिक्षकांनी त्याला शाळेच्या परिसरात डांबून ठेवले होते. त्यानंतर प्रचंड धास्तावलेल्या प्रकाशने बनासकांठा येथील आंबेकरनगर सोसायटीतील आपल्या घरी परतल्यानंतर वडिलांना झालेल्या प्रकाराची माहिती दिली होती. विमनस्क अवस्थेत काही तासांतच त्याने गळफास लावून आयुष्य संपवले. प्रकाशच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीच्या आधारावर चार शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.---------संतप्त जमावाचा शाळेवर हल्लाप्रकाशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी या शाळेवर धडक देत मालमत्तेची नासधूस केली. त्यामुळे या परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांची आणखी कुमक मागवण्यात आली होती. अनुचित घटना टाळण्यासाठी पोलिसांच्या संरक्षणात त्याचा अंत्यविधी पार पाडण्यात आला.