शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
3
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
4
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
5
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
6
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
7
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
8
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
9
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
10
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
11
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
12
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
13
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
14
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
15
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
16
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
17
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
18
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
19
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
20
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!

ऑनलाईन रमीच्या नादात शिक्षिका चोर बनली,बुरखा घालून ८ लाखांवर डल्ला मारला; चेहऱ्यावरील तीळामुळे सापडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 11:42 IST

अहमदाबादमधील एका नर्सिंग कॉलेजच्या उपप्राचार्य महिलेने ऑनलाइन रमीच्या नादात ८ लाख रुपये चोरले. शिक्षिकेने बुरखा घालून चोरी केली.

अहमदाबादमधील मेघनानगर येथील एका नर्सिंग कॉलेजच्या उपप्राचार्याला ८ लाख रुपये चोरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. पोलिसांना या प्रकरणात तिच्या उजव्या डोळ्याजवळील तीळावरून सुगावा लागला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये बुरखा घातलेली एक महिला कॉलेजच्या तिजोरीतून चोरून पैसे काढताना दिसत होती आणि तीळामुळे तिची ओळख पटवली.

भारताचे तसे शेजारीच: आशियातील दोन देश सीमेवर भिडले; सैन्यामध्ये गोळीबार, युद्धपूर्व तणाव...

मिळालेली माहिती अशी,  त्या महिलेला ऑनलाइन रमीचे इतके व्यसन लागले होते. ती कर्जाच्या जाळ्यात अडकली. या कर्जातून बाहेर पडण्यासाठी आणि खेळत राहण्यासाठी तिने कॉलेजच्या तिजोरीतून पैसे चोरण्याचा मार्ग निवडला. २२ जुलै रोजी सकाळी ६ वाजता तिने तिजोरीतून ५०० रुपयांच्या नोटांचा एक बंडल काढला, यामध्ये एकूण ८ लाख रुपये होते.

सीसीटीव्हीमुळे उघडकीस

सकाळी महाविद्यालयाच्या प्राचार्यांना तिजोरी रिकामी आढळली तेव्हा ही बाब उघडकीस आली. त्यांनी ताबडतोब कर्मचाऱ्यांना एकत्र केले आणि चौकशी सुरू केली.  उपप्राचार्य, त्यावेळी तिथे उपस्थित होते, जणू काही काहीच घडलेच नाही असं दाखवलं. पण पोलिसांनी रात्रभर सीसीटीव्ही फुटेज बारकाईने तपासले आणि त्या तीळाने संपूर्ण रहस्य उघड केले. उपनिरीक्षक आर.एम. चावडा म्हणाले, 'फुटेजमध्ये बुरखा घातलेल्या महिलेच्या उजव्या डोळ्याजवळ तीळ दिसल्यानंतर आम्हाला संशय आला. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही उपप्राचार्यांकडे चौकशी केली आणि त्यांना व्हिडीओ दाखवला तेव्हा त्यांनी आपला गुन्हा कबूल केला.'

पोलिसांनी तिच्या शाहीबाग येथील घरातून २.३६ लाख रुपये रोख जप्त केले. उर्वरित ५.६४ लाख रुपये रात्रीतून त्याच्या ऑनलाइन गेमिंग वॉलेटमध्ये ट्रान्सफर करण्यात आले. पोलिसांनी ते वॉलेट गोठवले आहे आणि उर्वरित रक्कम वसूल करण्यासाठी कारवाई सुरू केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस