शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक! शिक्षिका आणि तिच्या बहिणीला जमावाकडून बेदम मारहाण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2020 15:32 IST

शिक्षिका आणि तिच्या बहिणीला जमावाकडून दोरीने बांधून मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना

कोलकाता -  शिक्षिका आणि तिच्या बहिणीला जमावाकडून दोरीने बांधून मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना दक्षिण दीनाजपूर जिल्ह्यातील फाटानगर गावात घडली आहे. स्मृतिकोना दास आणि त्यांची मोठी बहीण सोमा दास अशी मारहाण झालेल्या महिलांची नावे आहेत. सदर शिक्षिका आणि तिच्या बहिणीने पंचायतीकडून बांधण्यात येत असलेल्या रस्त्यासाठी घरासमोरील अधिकची जागा देण्यास नकार दिल्याने ही मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, माहराण करणाऱ्या जमावाचे नेतृत्व तृणमूल काँग्रेसचे नेते अमल सरकार करत होते. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सदर नेत्याला पक्षातून निलंबित केले आहे. मात्र रविवारी रात्रीपर्यंत कुणाविरोधात अटकेची कारवाई झाली नव्हती. दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमा णात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती स्मृतिकोना दास यांचे पाय दोरीने बांधतान दिसत आहे. तर बाकीचा जमाव त्यांना फरफटत नेत मारहाण करत आहे. त्यानंतर स्मृतिकोना यांची बहिण सोमा दास या त्यांना वाचवण्यासाठी आल्यावर जमावाने त्यांनाही मारहाण केली. दरम्यान दोन्ही महिलांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.   रस्त्यासाठी 12 फूट जागा लागेल असे पंचायतीकडून आम्हाला सांगण्यात आले होते. मात्र नंतर रस्त्याची लांबी वाढवून 24 फूट एवढी करण्यात आली. त्यामुळे आमची अधिकची जमीन रस्त्यासाठी गेली असते. म्हणून आम्ही रस्त्याच्या कामास विरोध नोंदवला होता. तसेच शुक्रवारपासून रस्त्याचे काम सुरू करण्यात आल्यानंतर आम्ही त्याला विरोध केला. त्यानंतर आम्हाला मारहाण करण्यात आली, अशी माहिती पीडित महिलांनी सांगितले.

धक्कादायक! शिक्षिकेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, माथेफिरू तरुणाचा प्रताप

अकोल्यात गोळीबाराचा थरार ; संपत्तीच्या वादातून वडीलाने केली मुलाची गोळी झाडून हत्या

प्रेमात अडकलेले मामी-भाचा पळाले!दरम्यान, स्मृतिकोना यांनी रविवारी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमध्ये ग्रामपंचायत उपाध्यक्ष अमल सरकार यांचे नाव आहे. स्मृतिकोना दास ह्या गावातील हायस्कूलमध्ये शिक्षिका आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीwest bengalपश्चिम बंगाल