शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय आराखड्याचाच अभ्यासक्रम शिकवा, शाळांना निर्देश देण्याचे बाल हक्क संरक्षण आयोगाचे पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2023 08:43 IST

Education: राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यानुसार (एनसीएफ) राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन परिषद (एनसीईआरटी) आणि राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेने (एससीईआरटी) विहित केलेला अभ्यासक्रम आणि मूल्यमापन प्रक्रियेचे पालन करण्याचे निर्देश सर्व सरकारी व खासगी शाळांना द्यावेत, असे सांगणारी पत्रे राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने सर्व राज्यांना पाठविली आहेत.

नवी दिल्ली : राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यानुसार (एनसीएफ) राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन परिषद (एनसीईआरटी) आणि राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेने (एससीईआरटी) विहित केलेला अभ्यासक्रम आणि मूल्यमापन प्रक्रियेचे पालन करण्याचे निर्देश सर्व सरकारी व खासगी शाळांना द्यावेत, असे सांगणारी पत्रे राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने सर्व राज्यांना पाठविली आहेत.

‘एनसीईआरटी’ आणि राज्य शैक्षणिक प्राधिकरणाशी सुसंगत नसलेला स्वतःचा अभ्यासक्रम लागू करण्याचा शिक्षण मंडळांचा कोणताही प्रयत्न शिक्षणाचा हक्क कायद्याचे (आरटीई) उल्लंघन आहे, असे या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. एखादे राज्य, मंडळ किंवा शाळा शैक्षणिक प्राधिकरणाने प्राथमिक विभागासाठी विहित केलेल्यापेक्षा वेगळा अभ्यासक्रम व मूल्यमापन पद्धती लागू करीत असेल तर ते प्रथमदर्शनी ‘आरटीई’चे उल्लंघन मानले जाईल. ही बाब राज्यातील सर्व शाळा आणि मंडळांना कळवावी, असे आयाेगाचे प्रमुख प्रियांक कानुनगो यांनी सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या प्रधान सचिवांना आणि सचिवांना लिहिलेल्या या पत्रात म्हटले आहे.

बालकांशी भेदभाव केला जाणार नाही अन्यथा...शैक्षणिक प्राधिकरणाने (एनसीईआरटी/एससीईआरटी) विहित व प्रकाशित केलेली पुस्तके वापरल्याबद्दल कोणत्याही बालकाशी भेदभाव केला जाणार नाही, तसेच त्याचा मानसिक, शारीरिक छळ केला जाणार नाही. असे घडल्यास संबंधितांवर बाल न्याय कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई केली जाईल, असेही या पत्रात म्हटले आहे. काही मंडळे स्वतःचा अभ्यासक्रम व मूल्यमापन प्रक्रिया लागू करून आरटीई कायद्याचे उल्लंघन करीत असल्याचे लक्षात आले आहे, असे आयोगाने आपल्या पत्रात अधोरेखित केले आहे.

‘सीबीएसई’च्या प्रणालीवर बोट‘एनसीपीसीआर’ प्रमुख म्हणाले की, ‘सीबीएसई’च्या प्रणालीचे पुनरावलोकन केल्यावर असे दिसून आले की, प्राथमिक स्तरावर सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाच्या (सीसीई) कल्पनेला मान्यता देताना या बोर्डाने केवळ ‘एनसीईआरटी’च्या कार्यक्षेत्रातच पाऊल ठेवले नाही तर ‘सीसीई’च्या उद्दिष्टांचा चुकीचा अर्थ लावला आहे. सीसीई सर्व शाळांमध्ये एकसमान अभ्यासक्रमाचा पुरस्कार करते.

टॅग्स :Educationशिक्षणIndiaभारत