शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

४४० व्होल्टचा झटका! लाखोंचं बिल पाहून चहावाल्याला हार्ट अटॅक; कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 11:48 IST

वीज विभागाचा हलगर्जीपणा आणि आलेल्या भल्या मोठ्या बिलाने एका गरीब वृद्धाचा बळी घेतला आहे.

उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यातून एक अत्यंत वेदनादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. वीज विभागाचा हलगर्जीपणा आणि आलेल्या भल्या मोठ्या बिलाने एका गरीब वृद्धाचा बळी घेतला आहे. भरथना पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या महावीर नगर परिसरात ही घटना घडली आहे. येथे राहणारे शिवपाल सिंह कश्यप हे टपरीवर चहा विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे, अचानक खूप जास्त बिल आल्यामुळे त्यांना धक्का बसला.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवपाल सिंह यांच्या घरी लावलेल्या स्मार्ट मीटरचं केवळ दोन महिन्यांचं बिल सुमारे ८० हजार रुपये आले होते. इतकी मोठी रक्कम पाहून ते प्रचंड अस्वस्थ झाले आणि बिल दुरुस्त करण्यासाठी त्यांनी अनेकदा वीज विभागाच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवले. मात्र प्रत्येक वेळी त्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन परत पाठवण्यात आलं आणि त्यांच्या समस्येचे निराकरण केलं गेलं नाही असा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.

प्रकरण इथेच थांबलं नाही. तिसऱ्या महिन्यात जेव्हा नवीन वीज बिल आलं, तेव्हा ती रक्कम वाढून सुमारे १ लाख ४० हजार रुपये झाली होती. इतकी मोठी रक्कम पाहून शिवपाल सिंह पूर्णपणे खचून गेले. सततचा मानसिक ताण आणि आर्थिक दबावामुळे त्यांना हार्ट अटॅक आला, ज्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर नातेवाईकांमध्ये प्रचंड संताप पसरला आहे. संतप्त नातेवाईकांनी मृतदेह घेऊन भरथना वीज केंद्र गाठलं आणि तिथेच निदर्शने सुरू केली. वीज विभागाच्या अधिकाऱ्यांवर गंभीर हलगर्जीपणा आणि भ्रष्टाचाराचे आरोप करत दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस, तहसीलदार आणि वीज विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. सुमारे तीन तास प्रशासकीय अधिकारी नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते. या दरम्यान परिसरातील वातावरण अत्यंत तणावपूर्ण होतं. याप्रकरणी वीज विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, ही बाब त्यांच्या निदर्शनास आली असून त्याची चौकशी केली जात आहे. जुन्या मीटरच्या रीडिंगचीही तपासणी केली जाईल आणि जे काही तथ्य समोर येईल, त्या आधारावर पुढील कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Outrageous Bill Kills Tea Seller; Family Devastated by Electricity Shock

Web Summary : An Uttar Pradesh tea seller died of a heart attack after receiving an inflated electricity bill of ₹1.4 lakhs. The family alleges negligence by the electricity department, leading to protests and demands for action against corrupt officials.
टॅग्स :electricityवीजUttar Pradeshउत्तर प्रदेश