टीडीएस, टीसीएसच्या नियमात सूट
By Admin | Updated: June 27, 2017 01:37 IST2017-06-27T01:37:07+5:302017-06-27T01:37:07+5:30
१ जुलैपासून वस्तू व सेवा कराचा (जीएसटी) पहिला रिटर्न दाखल करण्यासाठी सरकारने अडीच महिन्यांची मुदत दिल्यानंतर आता सरकार
_ns.jpg)
टीडीएस, टीसीएसच्या नियमात सूट
नितीन अग्रवाल ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : १ जुलैपासून वस्तू व सेवा कराचा (जीएसटी) पहिला रिटर्न दाखल करण्यासाठी सरकारने अडीच महिन्यांची मुदत दिल्यानंतर आता सरकार या प्रकरणात मवाळ झालेले दिसत आहे. जीएसटीचे नियम शिथिल करताना टीडीएस आणि टीसीएसच्या नियमात सूट देण्याची घोषणा सरकारने केली आहे.
अर्थ मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले की, सीजीएसटी/ एसजीएसटी कायद्याच्या २०१७ च्या कलम ५१ आणि ५२ ला सद्या स्थगित केले आहे. याची अंमलबजावणी नंतर करण्यात येईल असे सांगितले असले तरी ती कधी करण्यात येईल, हे सांगितले नाही. मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, याबाबत नंतर सूचना जारी करण्यात येईल. ज्या व्यक्तींना टीडीएस आणि टीसीएस लागू होतो त्यांना नोंदणी करावी लागेल. जीएसटीच्या कलम २२ व कलम २४ नुसार टीडीएसच्या कक्षेत येणाऱ्या ई कॉमर्सच्या व्यापाऱ्यांना नोंदणीतूनही सूट दिली आहे, असेही मंत्रालयाने स्पष्ट केले. या माध्यमातून ई कॉमर्सच्या व्यापाऱ्यांना अधिक वेळ देण्याचा प्रयत्न आहे, असे सांगण्यात येत असले तरी तज्ज्ञांच्या मतानुसार, विरोध झाल्यानंतर सरकारला यात सूट द्यावी लागली आहे.