शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

निवडणुकीच्या निकालानंतर TDP ची 'चांदी', पक्षाशी संबंधित कंपन्यांचे शेअर्स 20 टक्क्यांनी वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2024 19:30 IST

TDP Related Company Stocks : लोकसभा आणि आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत TDP ने मोठी कामगिरी केली आहे.

Telugu Desam Party Related Stocks: लोकसभा आणि आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि तेलुगु देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांचा आनंद गगनात मावेना. त्यांच्या पक्षाने विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत बंपर विजय मिळवल्यामुळे ते किंगमेकरच्या भूमिकेत आले आहेत. तेलुगू देसम पक्षाने विधानसभेत 135 तर लोकसभा निवडणुकीत 16 जागा मिळवल्या आहेत. यामुळे त्यांना एनडीए सरकारमध्ये मंत्रिपद मिळणारच आहे, पण शेअर बाजारातूनदेखील त्यांना मोठा लाभ मिळाला आहे.

या शेअर्समध्ये 20 टक्क्यांपर्यंत वाढ चंद्राबाबू नायडू चौथ्यांदा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होणार असून, लोकसभा निवडणुकीतदेखील त्यांच्या पक्षाचा मोठा विजय झाला. त्यामुळेच त्यांच्या पक्षाशी संबंधित कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली. मिळलेल्या माहितीनुसार, तेलुगु देसम पार्टी (टीडीपी) शी संबंधित कंपन्यांचे शेअर्स 5 जून रोजी 20 टक्क्यांनी वाढले. 

हेरिटेज फूड्सच्या शेअर्समध्ये जोरदार वाढTDP शी संबंधित कंपनी हेरिटेज फूड्सच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या हा शेअर 546.50 रुपयांचा विक्रमी उच्चांकावर आहे. टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी हेरिटेज फूड्सची स्थापना केली होती. कंपनीअंतर्गत तीन व्यावसायिक विभाग - डेअरी, रिटेल आणि कृषीसेवा आहे. चंद्राबाबू यांचा मुलगा नारा लोकेश हेरिटेज फूड्सच्या प्रवर्तकांपैकी एक आहेत. हेरिटेज फूड्सचे शेअर्स गेल्या तीन ट्रेडिंग सत्रांमध्ये सुमारे 38 टक्क्यांनी वाढले आहेत.

अमरा राजा एनर्जीमध्ये बंपर वाढ आज नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) वर अमरा राजा एनर्जीचा शेअर 14 टक्क्यांनी वाढून 1233.95 रुपयांवर व्यवहार करत होता. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक हे TDP संसदीय पक्षाचे माजी नेते गल्ला जयदेव आहेत. दोन वेळचे खासदार आणि अमरा राजा ग्रुपच्या प्रमुखांनी या वर्षी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता, परंतु त्यांच्या पक्षाच्या प्रचंड विजयामुळे कंपनीला मोठा नफा मिळत आहे.

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालChandrababu Naiduचंद्राबाबू नायडूAndhra Pradeshआंध्र प्रदेश