शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

तिरुपती मंदिरात दान केल्या जाणाऱ्या केसांची चीनला विक्री? आंध्र प्रदेशातलं राजकारण तापलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2021 16:06 IST

Tirumala Temple News: आंध्र प्रदेशचे माजी मंत्री आणि तेलगु देसम पक्षाचे (टीडीपी) नेते अयन्ना पत्रुदु यांनी सुप्रसिद्ध तिरुपती मंदिरात भक्तांकडून दान केल्या जाणाऱ्या केसांची परदेशात तस्करी केली जात असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.

Tirumala Temple News: आंध्र प्रदेशचे माजी मंत्री आणि तेलगु देसम पक्षाचे (टीडीपी) नेते अयन्ना पत्रुदु यांनी सुप्रसिद्ध तिरुपती मंदिरात भक्तांकडून दान केल्या जाणाऱ्या केसांची परदेशात तस्करी केली जात असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. केसांच्या तस्करीमध्ये सत्ताधारी पक्ष वायआरएस काँग्रेसमधील अनेक बड्या नेत्यांचा हात असल्याचा आरोप देखील अयन्ना पत्रुदु यांनी केला आहे. तिरुपती मंदिरात दान केले जाणारे केस म्यानमार, थायलंड आणि चीनला विकले जात असल्याचा आरोप टीडीपीनं केलाय. 

मिझोराम-म्यानमार सीमेवर तैनात असलेल्या आसाम रायफल्सच्या जवानांनी नुकतंच २ कोटी रुपये किमतीचे माणसांचे केस जप्त केले होते. याचाच दाखला देत टीडीपीनं सत्ताधारी पक्षावर जोरदार घणाघात केला आहे. या घटनेतून राज्य सरकारचा भांडाफोड झाल्याची टीका टीडीपीनं केली आहे. "वायएसआर काँग्रेसचे नेते रेती, सिमेंट आणि दारूसोबतच केसांचीही तस्करी करत असून यांची माफीयागँग उघडकीस आली आहे", असं अयन्ना पत्रुदु म्हणाले. 

जगनमोहन रेड्डी यांना सवालतिरूपती मंदिरातील केस हे सुरुवातीला म्यानमारला पाठवले जातात. त्यानंतर पुढील प्रक्रियेसाठी ते थायलंड आणि चीनला पाठवले जातात, असा आरोप पत्रुदु यांनी केला आहे. या केसांचा उपयोग विग बनविण्यासाठी केला जातो आणि याचा व्यापार संपूर्ण जगभरात पसरला आहे, असा दावाही त्यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकारावर जगनमोहन रेड्डी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारनं स्पष्टीकरण द्यायला हवं, अशी मागणी टीडीपीनं केली आहे. केस माफिया टोळीवर अंकुश ठेवण्यात सरकार अपयशी का ठरत आहे?, असाही सवाल त्यांनी केला आहे. 

हिंदू भावना दुखावल्याचा आरोप"भक्तांनी दान केलेल्या केसांच्या तस्करीला मदत करुन वायआरएस काँग्रेसच्या नेत्यांनी हिंदुंच्या भावना दुखावण्याचं काम केलं आहे. जगभरातून लाखो भाविक येथे येत असतात. देवावरील श्रद्धेपोटी ते आपले केस दान करत असतात. पण सत्ताधारी पक्षाचे नेते मंदिराच्या प्रतिमेला ठेच पोहोचविण्याचं काम करत आहेत", असं पत्रुदु यांनी म्हटलं आहे. 

तिरुपती मंदिर ट्रस्टने आरोप फेटाळलेतिरुपती मंदिराचं व्यवस्थापन पाहणाऱ्या तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टनं (टीटीडी) केसांच्या तस्करीबाबतच्या आरोपांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं म्हटलं आहे. तिरुपती मंदिरानं भक्तांनी दान केलेल्या केसांच्या स्टोरेज, प्रोसेसिंग, हँडलिंग आणि ट्रान्सपोर्टेशनसाठी योग्य नियमावली व प्रणाली तयार केली आहे. यात कोणत्याही चुकीच्या कृत्याची शक्यताच नाही, असं तिरुपती मंदिर ट्रस्टचे अधिकारी एवी धर्म रेड्डी यांनी सांगितलं.

टॅग्स :tirupati-pcतिरुपतीAndhra Pradeshआंध्र प्रदेश