शहरं
Join us  
Trending Stories
1
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
2
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
3
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
4
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
5
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
6
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
7
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
8
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
9
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
10
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
11
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
12
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

ट्रायच्या प्रमुखांच्या खात्यात हॅकर्सनी जमा केला रुपया!; आधार सुरक्षिततेचा दावा पोकळ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2018 06:03 IST

टेलिकॉम रेग्युलेटरी आॅथोरिटी आॅफ इंडिया (ट्राय) चे प्रमुख आर. एस. शर्मा यांच्या आधार क्रमांकावरून इथिकल हॅकर्सनी त्यांची १४ प्रकारची माहिती लीक केली आहे.

बंगळुरू : टेलिकॉम रेग्युलेटरी आॅथोरिटी आॅफ इंडिया (ट्राय) चे प्रमुख आर. एस. शर्मा यांच्या आधार क्रमांकावरून इथिकल हॅकर्सनी त्यांची १४ प्रकारची माहिती लीक केली आहे. एवढेच नव्हे, त्यांच्या बँक खात्यांची माहिती मिळवून, त्यापैकी एका खात्यात आधारशी संलग्न पेमेंट सर्व्हिसमधून त्यांनी एक रुपयाही जमा केला आहे. त्यामुळे स्वत:चा आधार क्रमांक जाहीर करून, तो किती सुरक्षित आहे, असे सांगण्याचा आर. एस. शर्मा यांच्या भलताच अंगाशी आला आहे. शिवाय आधारच्या सुरक्षिततेविषयीचा दावाही पूर्णत: फोल ठरला आहे.हॅकर्सनी आपण एक रुपया शर्मा यांच्या बँक खात्यात एक रुपया जमा केल्याचा दावा ट्विटरववरून करताना पुरावा त्याचा स्क्रीनश़ॉटही त्याला जोडला आहे. शिवाय शर्मा यांच्या खात्यात पैसे जमा केल्याचा ट्रॅन्झॅक्शन आयडी नंबरही त्यांनी पोस्ट केला आहे. इथिकल हॅकर्समधून ओळखल्या जाणाऱ्या एलियन एल्डरसन, पुष्पेंद्र सिंह, कनिष्क सजनानी, अनिवर अरविंद आणि करण सैनी यांनी आतापर्यंत शर्मा यांची १४ प्रकारची माहिती लीक झाल्याचा दावा केला आहे. त्या डेटामध्ये ट्रायच्या प्रमुखांच्या घराचा पत्ता, मोबाइल क्रमांक, जन्मतारीख, पॅनकार्ड क्रमांक, मतदार ओळखपत्र क्रमांकाचा समावेश आहे.आर. एस. शर्मा यांनी आपला आधार क्रमांक जाहीर केल्यानंतर काही मिनिटांतच एल्डर्सन यांनी शर्मा यांचा पत्ता, आधार कार्डसोबत जोडण्यात आलेला मोबाइल क्रमांक, ई-मेल आयडी, जन्मदिनांक व त्यांचे व्हॉट्सअ‍ॅपवर असलेली छायाचित्रेही सार्वजनिक केली होती. मात्र या माहितीचा कोणी दुरुपयोग करू नये, यासाठी ती स्पष्ट दिसणार नाही, याची काळजी घेतली होती. (वृत्तसंस्था)पंतप्रधान मोदींना आव्हानशर्मा यांची गोपनीय माहिती उघड केल्यानंतर एल्डरसन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचा १२ अंकी आधार क्रमांक सार्वजनिक करण्याचे आव्हान दिले आहे. अर्थात पंतप्रधान तसे करण्याची अजिबात शक्यता आही.शर्मा यांचा डेटा हॅक झालेला नाही, त्यांची सर्वांना माहीत असलेली माहितीच दाखवून, आम्ही हा डेटा हॅक केला, असा दावा हॅकर्स करीत आहे, असे आधारने म्हटले आहे.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्ड