रेल्वेचे तात्काळ तिकीट महागले

By Admin | Updated: October 2, 2014 16:19 IST2014-10-02T16:19:51+5:302014-10-02T16:19:51+5:30

प्रवासी भाडेवाढीचा शॉक दिल्यानंतर आता रेल्वेने ऐन सणासुदीच्या काळात तात्काळ तिकीटांमध्ये प्रिमियम चार्ज लावण्याचा निर्णय घेतला आहे.

Tatkal ticket is expensive | रेल्वेचे तात्काळ तिकीट महागले

रेल्वेचे तात्काळ तिकीट महागले

>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २ - प्रवासी भाडेवाढीचा शॉक दिल्यानंतर आता रेल्वेने ऐन सणासुदीच्या काळात तात्काळ तिकीटांमध्ये प्रिमियम चार्ज लावण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार तात्काळ कोट्यातील ५० टक्के बुकिंग झाल्यानंतर उर्वरित ५० टक्के तिकीटांना हा नवीन चार्ज लावला जाणार आहे.
रेल्वे मंत्रालयाने प्रवासी भाड्यात वाढ केल्यानंतर तात्काळ तिकीटांमध्येही छुपी दरवाढ करुन प्रवाशांच्या खिशाला कात्री लावली होती. आता यात आणखी भर घालण्यात आली आहे. रेल्वे मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तात्काळ तिकीटांमध्ये आता प्रिमियम चार्ज लागू केले जाणार आहेत. यात सुरुवातीच्या ५० टक्के तिकीटांना हा चार्ज  लागू होणार नाही. मात्र ५० टक्के बुकींग झाल्यावर उर्वरित तिकीटांना हा प्रिमियम चार्ज आकारला जाणार आहे. जशा जागा कमी होत जातील तसे उर्वरित जागेच्या दरात वाढ होत जाईल असे या प्रिमियम रेटचे सूत्र आहे. 
प्रिमियम चार्ज  सर्व गाड्यांममध्ये लागू केल्याची चर्चा असली तरी रेल्वे अधिका-यांनी सध्या प्रत्येक झोनमधील फक्त चार गाड्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ही योजना राबवली जात असल्याचे स्पष्ट केले. 

Web Title: Tatkal ticket is expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.