टाटा मोटर्सच्या गुजरातमधील कारखान्यातली आग आटोक्यात
By Admin | Updated: June 16, 2016 19:33 IST2016-06-16T18:34:03+5:302016-06-16T19:33:20+5:30
टाटा मोटर्सच्या नॅनो कारचं उत्पादन होणाऱ्या साणंद येथील कारखान्यामध्ये आग लागल्याचे वृत्त आहे.

टाटा मोटर्सच्या गुजरातमधील कारखान्यातली आग आटोक्यात
ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. 16 - टाटा मोटर्सच्या नॅनो कारचं उत्पादन होणाऱ्या साणंद येथील कारखान्यामध्ये आग लागली होती. या आगीवर अग्निशमन दलाच्या जवानांनी नियंत्रण मिळवलं आहे. दुपारच्या सुमारास ही आग लागली होती. गुजरातमधली अधिकाऱ्यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे. आगीत कोणतीही जीवितहानी नाही. मात्र मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे.
Fire breaks out at Tata Nano's vendor park Sanand (Gujarat), fire tenders douse the flames pic.twitter.com/JL6whQwbju
— ANI (@ANI_news) June 16, 2016