टाटा समूहच्या तिघांचे राजीनामे

By Admin | Updated: October 30, 2016 02:02 IST2016-10-30T02:02:38+5:302016-10-30T02:02:38+5:30

टाटा उद्योग समूहाच्या अध्यक्ष पदावरून सायरस मिस्त्री यांना हटविण्यात आल्यानंतर मिस्त्री यांच्या विश्वासातील एन. एस. राजन, मधू कन्नन आणि निर्माल्य कुमार या तीन वरिष्ठ

Tata group resigns | टाटा समूहच्या तिघांचे राजीनामे

टाटा समूहच्या तिघांचे राजीनामे

मुंबई: टाटा उद्योग समूहाच्या अध्यक्ष पदावरून सायरस मिस्त्री यांना हटविण्यात आल्यानंतर मिस्त्री यांच्या विश्वासातील एन. एस. राजन, मधू कन्नन आणि निर्माल्य कुमार या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याचे वृत्त आहे. स्वत: या तिघांशी संपर्क होऊ शकला नाही व टाटा समूहाने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. राजन टाटा समुहाचे एचआर विभागाचे प्रमुख होते. कन्नन ‘ग्रुप बिझिनेस डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड पीआर’ विभागाचे तर निर्माल्य कुमार ‘ग्रुप स्ट्रॅटेजी एक्झिक्युटिव्ह’ होते. मिस्त्री यांनी समुहाची दीर्घकालिन धोरणे आखण्यासाठी नेमलेल्या पाच सदस्यीय ग्रुप एक्झिक्युटिव्ह कौन्सिल’चे हे तिघेही सदस्य होते. मिस्त्रींच्या गच्छंतीनंतर ही कौन्सिल विसर्जित करण्यात आली होती. त्या कौन्सिलपैकी मुकुंद राजन आणि हरीश भट या इतर दोन सदस्यांना कोणती नवी जबाबदीरी मिळणार हे अद्याप स्पष्ट नाही. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Tata group resigns