टाटा ग्रुपचे चेअरमन सायरस मिस्त्री यांनी ढाब्यावर घेतला जेवणाचा आस्वाद

By Admin | Updated: May 18, 2016 14:27 IST2016-05-18T14:14:01+5:302016-05-18T14:27:44+5:30

टाटा ग्रुपचे चेअरमन सायरस मिस्त्री चक्क ढाब्यामध्ये बसून जेवतानाचा फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे

Tata Group Chairman Cyrus Mistry swings at the dhaba | टाटा ग्रुपचे चेअरमन सायरस मिस्त्री यांनी ढाब्यावर घेतला जेवणाचा आस्वाद

टाटा ग्रुपचे चेअरमन सायरस मिस्त्री यांनी ढाब्यावर घेतला जेवणाचा आस्वाद

ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 18 - सोशल मिडियावर सध्या टाटा ग्रुपचे चेअरमन सायरस मिस्त्री यांचा फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये सायरस मिस्त्री चक्क ढाब्यामध्ये बसून जेवताना दिसत आहे. फेसबुकवर या फोटोला 2 हजाराहून जास्त लोकांनी शेअर केला असून ट्विटवरदेखील फोटो रिट्विट होत आहे. इतक्या मोठ्या पदावर असणारी व्यक्ती सामान्य व्यक्तीप्रमाणे ढाब्यामध्ये बसून जेवत असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. 
 
आश्चर्यासोबत सायरस मिस्त्री यांच्या साधेपणाचं कौतुकही केलं जात आहे. उद्योजक हर्ष गोयंका यांनीदेखील हा फोटो ट्विटवर शेअर केला असून सायरस मिस्त्री यांचं कौतुक केलं आहे. 
 
टाटा सन्सकडे या फोटोबद्दल विचारणा केली असता हा फोटो एप्रिल 2015मध्ये काढण्यात आल्याची माहिती दिली आहे. मात्र गेल्या काही दिवसात सोशल मिडियावर हा फोटो व्हायरल झाला आहे. 
सायरस मिस्त्री नेमके कोणत्या ठिकाणी बसले आहेत हे कळू शकलेले नाही. पण या फोटोमध्ये सायरस मिस्त्री ढाब्यावरील एका खाटेवर बसून जेवणाचा आस्वाद घेताना दिसत आहेत. सोबत कोल्ड ड्रिंक आणि टिशू पेपरचा बॉक्सदेखील ठेवला आहे. आपल्या पदाचा किंवा मोठेपणाचा कोणताही गाजावाजा न करता सायरस मिस्त्री इतर लोकांप्रमाणे बसून जेवताना दिसत आहेत. 
 

Web Title: Tata Group Chairman Cyrus Mistry swings at the dhaba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.