शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
2
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
3
उपराष्ट्रपती निवडणुकीत कुणाचं पारडं जड? एनडीए की इंडिया, कोण मारणार बाजी, असं आहे संसदेतील मतांचं गणित  
4
"ते मराठीत न बोलल्याने भाषेला भोकं पडणार का?’’, अभिनेत्री केतकी चितळेचं वादग्रस्त विधान
5
"सोनिया गांधी आमच्या देवी आहेत, त्यांनी…”, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी उधळली स्तुतीसुमने   
6
WTC मध्ये भारताचा टॉपर ठरला रिषभ पंत! हिटमॅन रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडला
7
हे सारं मी त्यांच्या सांगण्यावरून केलं, बनावट दूतावास चालवणाऱ्या हर्षवर्धनचा धक्कादायक दावा   
8
IND vs ENG 4th Test Day 2 Stumps: मॅच आधी गिलनं ज्यांना डिवचलं त्या दोघांनीच दमवलं; शेवटी...
9
Asia Cup 2025 : बीसीसीआय UAE च्या मैदानात स्पर्धा घेणार; भारत-पाक हायहोल्टेज मॅचही पाहायला मिळणार?
10
Anshul Kamboj vs Ben Duckett: अंशुल कंबोजची पहिली टेस्ट विकेट! बेन डकेट 'नर्व्हस नाइंटी'चा शिकार
11
"देशासाठी लढणारा मराठी माणूस कधी..., काहींना शिवरायांच्या नावाची ॲलर्जी"; मुख्यमंत्री फडणवीस यांचं जोरदार भाषण
12
Hulk Hogan Death: 'बालपणीचा सुपरहिरो' प्रसिद्ध WWE स्टार हल्क होगनचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
मग मृतांना निवडणुकीत मतदान करायला द्यायचं का? राहुल-तेजस्वींना निवडणूक आयोगाचा सवाल
14
VIDEO: ती आली अन् थेट त्याला बिलगली... चहल-महावशची एकमेकांना घट्ट मिठी, क्लिप व्हायरल
15
चक्क दारूच्या ट्रकवर राज्यामंत्र्याचे नाव, ४० लाखांची विदेशी दारू, सात आराेपींना घेतले ताब्यात
16
'या लोकांचे प्रफुल्ल लोढासोबत काय संबंध आहेत?', गिरीश महाजनांच्या संयमाचा कडेलोट, 'मविआ'ला थेट फोटोच दाखवले
17
दिल्लीतील JNU मधील देवेंद्र फणडवीसांच्या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांचं आंदोलन, महायुती सरकारविरोधात घोषणाबाजी
18
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी गुप्तचर संस्थेत नोकरी; मुंबई, नागपूरसाठी 'इतक्या' जागा राखीव!
19
Rishabh Pant Fifty : भारताच्या 'जखमी वाघा'ची डरकाळी! लढवय्या पंतनं ठोकली सॉलिड फिफ्टी
20
₹1600 वर पोहोचू शकतो इलेक्ट्रिक बस बनवणाऱ्या कंपनीचा शेअर, खरेदीसाठी उडालीय लोकांची झुंबड; करतोय मालामाल!

बलात्कार व खुनापेक्षा हस्तमैथुन केलेलं चांगलं- तस्लिमा नसरिन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2018 13:48 IST

दिल्लीतील बसमध्ये एका व्यक्तीने हस्तमैथुन केल्याच्या प्रकरणावर प्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरिन यांनी मत मांडलं आहे.

नवी दिल्ली- दिल्लीतील बसमध्ये एका व्यक्तीने हस्तमैथुन केल्याच्या प्रकरणावर प्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरिन यांनी मत मांडलं आहे. हस्तमैथुन करणं हा अपराध मानू नये, असं मत तस्लिमा नसरिन यांनी व्यक्त केलं आहे. पण, तस्लिमा नसरिन यांच्या या वक्तव्यावर ट्विटरकरांनी मात्र सहमती दर्शविली नाही. दिल्लीत प्रवाशांनी भरलेल्या बसमध्ये एक व्यक्ती हस्तमैथुन करत होता. रेप कल्चरमध्ये याला मोठा अपराध समजला जाऊ नये. पुरूषांनी बलात्कार किंवा खून करण्याऐवजी हस्तमैथुनच करावं. सार्वजनिक स्थळावार हस्तमैथुन करणं गुन्हा आहे का ? खरं तर हा असा गुन्हा आहे की, ज्यामध्ये कोणी पीडित नसतं, असं ट्विट तस्लिमा नसरिन यांनी केलं. 

तस्लिमा नसरिन यांचं हे वक्तव्य ट्विटर युजर्सला रूचलं नसल्याने सोशल मीडियावर या वक्तव्याला मोठा विरोध होताना दिसतो आहे. आम्ही मॉडर्न होतो आहे, याचा अर्थ आम्ही निर्लज्ज होतो आहे असा नाही, असं मत एका ट्विटर युजरने व्यक्त केलं. हस्तमैथुन, शारीरिक संबंध सार्वजनिक ठिकाणावर योग्य नाही, अशीही कमेंट सोशल मीडियावर करण्यात आली. हा गुन्हा असून अजाणतेपणे असं कृत्य पाहणाऱ्याला धक्का बसतो असं एका युजरने म्हणत आपल्याच एका नातेवाईकाचे उदाहरणही दिलं आहे.

सोशल मीडियावरील या कमेन्ट्सनंतर तस्लिमा नसरिन यांनी मंगळवारी आणखी एक ट्विट केलं. 'बस, ट्रेन, गल्ली-बोळ्या, गर्दीची ठिकाणं, रात्र, दिवस, शाळा, ऑफिस इतकंत नाही, तर घरातही महिला सुरक्षित नाहीयेत. या सगळ्याचं कारण पुरूष आहेत. त्यांना स्त्रीयांबद्दल असलेली द्वेषाची भावना कमी करायला हवी, त्यांच्या अशा वागण्याने अर्धी लोकसंख्या आरामात जीवन जगेल, असं तस्लिमा नसरिन यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये म्हंटलं. दरम्यान, पहिल्या ट्विटमधून तस्लिमा नसरिन यांनी उपरोधिकपणे टोला लगावला याबद्दल काही स्पष्टता नाही. नेमकं प्रकरण काय?

काय आहे प्रकरणदिल्ली विद्यापीठात शिकणारी एक तरुणी ७ फेब्रुवारी रोजी बसने वसंत व्हिलेजमधून आयआयटी गेट येथे जात होती. ‘सकाळी बसमध्ये गर्दी होती. माझ्या बाजूला बसलेला तरुण हस्तमैथुन करत होता. तो मला सारखा हातही लावत होता. मी जेव्हा लोकांना याबद्दल सांगितलं तेव्हा त्यांनी दुर्लक्ष केलं. कुणीही मदतीला पुढे आलं नाही. मी या घटनेचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर अपलोड केला. मी त्या व्यक्तीला ओरडून जाब विचारला पण त्याने लक्ष दिलं नाही, असं त्या मुलीने म्हंटलं.  

टॅग्स :Taslima Nasrinतस्लिमा नसरिनTwitterट्विटरNew Delhiनवी दिल्ली