शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

तरूण तेजपाल प्रकरणात सुनावणी पूर्ण, निकाल ठेवला राखून

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2017 18:12 IST

पत्रकार युवतीवरील बलात्कार प्रकरणातील आरोपपत्र रद्द करण्याच्या आरोपी तरूण तेजपाल याच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठात सुनावणी पूर्ण झाली असून खंडपीठाने निवाडा राखून ठेवला आहे. 

पणजी: पत्रकार युवतीवरील बलात्कार प्रकरणातील आरोपपत्र रद्द करण्याच्या आरोपी तरूण तेजपाल याच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठात सुनावणी पूर्ण झाली असून खंडपीठाने निवाडा राखून ठेवला आहे. युवतीवरील बलात्कार प्रकरणात आपल्यावर ठेवण्यात आलेले आरोप हे साफ खोटे असून ते रद्द करण्यात यावेत अशी याचिका तेजपाल याने खंडपीठात केली होती. म्हाप्सा विशेष न्यायालयात त्याच्या विरुद्ध आरोप निश्चित करण्यात आल्यानंतर तेजपालने त्यांना खंडपीठात आव्हान दिले होते. तेजपालचे वकील अमर लेखी यांनी जुनेच युक्तिवाद करताना आरोप निराधार असल्याचे सांगितले. या प्रकरणाचा तपास करणा:या क्राईम ब्रँचकडून सीसीटीव्ही फुटेज देण्यात आलेली नाही. तसेच इतर माहिती देण्यात आली नसल्याचे सांगितले. तेजपाल त्या युवतीवर आगळीक करीत असल्याचे कुठेच कँम:यातही टीपले गेलेले नाही. त्यामुळे हे आरोप रद्दबातल ठरवावेत अशी मागणी त्यांनी केली. क्राईम ब्रँचचे वकील सरेश लोटलीकर यांनी तेजपालची ही याचिका म्हणजे वेळकाढू धोरण असल्याचे सांगितले. क्राईम ब्रँचकडून या प्रकरणात तेजपालविरुद्ध सर्व पुरावे मिळविले असल्याचे त्यांनी सांगितले. त्यात साक्षिदार, पीडीत मुलीची जबानी, तेजपालचे इमेल या सर्वाचा उल्लेख केला. उभय बाजू ऐकून  घेतल्यानंतर न्यायमूर्ती नूतन सरदेसी यांनी या प्रकरणात निवाडा राखून ठेवल्याचे जाहीर केले. दरम्यान तेजपाल प्रकरणात म्हापसा न्यायालयात 9 जानेवारीपासून खटला सुरू होणार होता. खंडपीठाच्या निवाडय़ावर या खटल्याचे भवितव्य अवलंबून आहे.

टॅग्स :Tarun Tejpalतरूण तेजपालCrimeगुन्हाCourtन्यायालयgoaगोवा