तरुण तेजपाल यांना जामीन

By Admin | Updated: May 19, 2014 14:31 IST2014-05-19T14:29:06+5:302014-05-19T14:31:00+5:30

बलात्कार प्रकरणी अटकेत असलेल्या तरुण तेजपाल यांना सुप्रीम कोर्टाने तीन आठवड्यांसाठी जामीन मंजूर केला आहे.

Tarun Tejpal bail plea | तरुण तेजपाल यांना जामीन

तरुण तेजपाल यांना जामीन

ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. १९ - बलात्कारप्रकरणी गोव्यातील तुरुंगात असलेले तरुण तेजपाल यांना सुप्रीम कोर्टाने सोमवारी जामीन मंजूर केला आहे. तेजपाल यांच्या आईचे निधन झाल्याने न्यायालयाने त्यांना तीन आठवड्यांसाठी जामीन दिला आहे. 
तेजपाल यांची आई शकुंतला (वय ८७) यांना ब्रेन ट्यूमरच्या आजाराने ग्रासले होते. सध्या त्या तेजपाल यांच्या उत्तर गोवा येथील बंगल्यात राहत होत्या. काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. रविवारी रात्री त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता. यानंतर तेजपाल यांच्या वकिलांनी सोमवारी सुप्रीम कोर्टात तेजपाल यांच्या जामीनासाठी याचिका दाखल केली. आईच्या अंत्यविधी व अन्य विधींसाठी तेजपाल यांना जामीन द्यावा असे त्यांच्या वकिलांनी याचिकेत म्हटले होते.  यानंतर सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर करण्यात आला. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये एका महिला सहका-यावर बलात्कार केल्याप्रकरणी तरुण तेजपाल यांना गोवा पोलिसांनी अटक केली होती.    

 

Web Title: Tarun Tejpal bail plea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.