दिल्लीत विदेशी महिलेसमोर अश्लील चाळे करणारा तरुण गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 07:34 IST2017-07-23T07:33:08+5:302017-07-23T07:34:22+5:30

विदेशी महिलेला पाहून अश्लील चाळे करणा-या 32 वर्षीय तरुणाला दिल्ली पोलिसांनी शनिवारी अटक केली.

Tarun Gajaad, who has been sexually assaulted by foreign women in Delhi | दिल्लीत विदेशी महिलेसमोर अश्लील चाळे करणारा तरुण गजाआड

दिल्लीत विदेशी महिलेसमोर अश्लील चाळे करणारा तरुण गजाआड

>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 23 - विदेशी महिलेला पाहून अश्लील चाळे करणा-या  32 वर्षीय तरुणाला दिल्ली पोलिसांनी शनिवारी अटक केली. पीडित महिला जर्मनीची राहणारी असून ती सध्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून पीएचडी करत असल्याची माहिती समोर आली आहे. त्या गाडीच्या नंबरच्याआधारे आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.  
ही घटना गुरूवारी पावणे तीनच्या सुमारास दिल्लीतील ग्रेटर कैलाश-2 परिसरात घडली. पीडित विदेशी महिला आपल्या कुत्र्याला फिरवण्यासाठी या परिसरात गेली होती. त्यावेळी संशयित तरुण तिच्याकडे विचित्र नजरेने पाहत होता. थोडे पुढे गेल्यानंतर त्या तरुणाने आपली पँट खोली ओढत हस्तमैथुन करायला सुरूवात केली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे विदेशी महिला घाबरली आणि तिने ओरडायला लागली. तसेच, या विदेशी महिलेने त्या तरुणाला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो आपल्या कारमध्ये बसून पसार झाला. मात्र प्रसंगावधान राखून या विदेशी महिलेने आपल्या मोबाईलमध्ये आरोपीच्या गाडीचा फोटो घेतला आणि पोलिसांत तक्रार दाखल केली.
याप्रकरणी पोलीस उपायुक्त रोमिल बनिया यांनी सांगितले की, पिडीत महिलेने घटनेच्यावेळी आरोपीच्या गाडीचा फोटो काढला होता. गाडीच्या फोटोवरुन आरोपीचा शोध घेण्यास मदत झाली. त्या गाडीचा नंबर फोटोमध्ये स्पष्ट दिसत होता. त्यामुळे महिलेच्या तक्रारीवरुन आरोपीला शुक्रवारी संध्याकाळी शाम हरियाणामधील पलवल येथून अटक करण्यात आली. 
दरम्यान, गेल्या दिवसांपूर्वी मुंबईत सुद्धा अशाच प्रकारच्या दोन घटना उघडकीस आल्या होत्या. लोकल ट्रेन आणि तपोवन एक्स्प्रेसमध्ये तरूण मुलींसमोर दोन तरूण हस्तमैथुन करत असल्याचे निदर्शनास आले होते. मुंबईतील पश्चिम रेल्वेमार्गावर झालेल्या या प्रकारात तर अश्लील चाळे करणाऱ्या तरूणाने मुलीला बलात्काराचीही धमकी दिली होती. तर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे तपोवन एक्स्प्रेसमध्येही असाच प्रकार उघडकीस आला होता.

Web Title: Tarun Gajaad, who has been sexually assaulted by foreign women in Delhi