शहरं
Join us  
Trending Stories
1
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
2
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
3
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
5
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
6
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
7
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
8
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
9
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
10
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
11
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
12
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
13
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
14
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
15
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
16
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
17
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
18
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
19
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
20
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)

तारसा....

By admin | Updated: February 16, 2015 21:12 IST

स्मशानभूमीची दैनावस्था

स्मशानभूमीची दैनावस्था
टिनाचे शेड जीर्ण : नवेगाव (आष्टी) येथील प्रकार
तारसा : नजीकच्या आष्टी (नवेगाव) ग्रामपंचायत अंतर्गत असलेले नवेगाव हे छोटेसे गाव. मृतांच्या अंत्यविधीसाठी ग्रामपंचायतने काही वर्षापूर्वी स्मशानभूमीची व्यवस्था केली. परंतु या स्मशानभूमीची सध्या चांगलीच दैनावस्था झाल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.
नवेगाव येथील ग्रामस्थांच्या सुविधेसाठी आष्टी मार्गावर टिनाचे शेड उभारून स्मशानभूमीचे काही वर्षांपूर्वी बांधकाम करण्यात आले. परंतु स्मशानभूमीतील टिनाचे शेड जीर्ण झाले आहे. त्यामुळे नागरिकांना मृतदेहाला मुखाग्नी कुठे द्यावा, असा प्रश्न निर्माण होतो. या स्मशानभूमीच्या निकृष्ट बांधकामामुळे शेडखाली असलेल्या ओट्याची खस्ता अवस्था आहे. परंतु, याकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
स्मशानभूमीलगत मोठ्या प्रमाणात झाडे-झुडपे वाढली. पावसाळ्याच्या दिवसांत अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांना जागेची शोधाशोध करावी लागते. त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करतात. या स्मशानभूमीच्या दुरुस्तीकडे स्थानिक प्रशासनाने लक्ष पुरवून शेड व सिमेंट ओट्याचे बांधकाम करावे. तसेच या परिसरातील झुडपे तोडण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)