टरमॅक बस विमानावर आदळली

By Admin | Updated: December 23, 2015 02:44 IST2015-12-23T02:28:56+5:302015-12-23T02:44:34+5:30

येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी जेट एअरवेजची टरमॅक बस एलायन्स एअरच्या विमानावर आदळल्याने विमानाचे नुकसान झाले.

The tarmac bus hit the plane | टरमॅक बस विमानावर आदळली

टरमॅक बस विमानावर आदळली

कोलकाता : येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी जेट एअरवेजची टरमॅक बस एलायन्स एअरच्या विमानावर आदळल्याने विमानाचे नुकसान झाले. हा अपघात घडला त्यावेळी विमानात कुणीही नव्हते तर बसमध्ये चालक दलाचे सदस्य होते. पहाटे हा अपघात झाला; परंतु यात कुणीही जखमी झाले नाही. त्यानंतर सिल्चर आणि शिलाँगला जाणाऱ्या या विमानाचे उड्डाण रद्द करण्यात आले.
या अपघाताला बेजबाबदारपणा कारणीभूत असल्याचा आरोप एअर इंडियाने केला तर ही केवळ एक दुर्घटना असल्याचे जेट एअरवेजने सांगितले.(वृत्तसंस्था)

Web Title: The tarmac bus hit the plane