शहरं
Join us  
Trending Stories
1
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
2
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषावादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
3
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
4
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
5
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
6
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
7
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
8
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
9
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
10
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
11
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
12
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
14
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
15
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
16
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
17
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
18
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
19
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?

जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलींग; 2 बिगर कश्मिरी मजुरांवर दहशतवाद्यांचा गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2024 21:48 IST

या घटनेत एका मजुराच्या हाताला, तर दुसऱ्याच्या पायाला गोळी लागली आहे.

Jammu-Kashmir Terror Attack : जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यातील मगम भागात 2 बिगर-काश्मिरी मजुरांवर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. घटनेनंतर क्विक रिस्पॉन्स टीम घटनास्थळी पोहोचली आणि शोधमोहीम सुरू करण्यात आली. जखमींना सध्या उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील सहानपूर येथील उस्मान मलिक (20) आणि सुफिया (25) या घटनेत जखमी झाले आहेत. उस्मानच्या उजव्या हाताला, तर सुफियानच्या उजव्या पायाला गोळी लागली आहे. दोघेही जलशक्ती विभागात रोजंदारीवर काम करत होते. सुदैवाने दोघांची प्रकृती सध्या स्थिर आहे. 

गेल्या काही दिवसांत अनेक हल्ले जम्मू-काश्मीरमध्ये गैर-काश्मिरींवर गोळीबार करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेकवेळा गैर-काश्मिरी नागरिकांना दहशतवाद्यांनी लक्ष्य केले आहे. गेल्या आठवड्यात बटागुंड त्रालमध्ये गोळीबारात एक जण जखमी झाल्याची माहिती मिळाली होती. जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये संघटित दहशतवाद कमी झाल्यानंतर टार्गेट किलिंगच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. गेल्या वर्षीही दहशतवाद्यांनी वेगवेगळ्या भागात निवडकपणे बिगर काश्मिरींची हत्या केली होती. अनंतनाग, पुलवामा आणि पुंछमध्ये टार्गेट किलिंगच्या अनेक घटना घडल्या.

यापूर्वीही प्रकरणे उघडकीस आली आहेतया वर्षी फेब्रुवारीमध्ये जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी टार्गेट किलिंग करत हब्बा कादल भागात शीख समुदायाच्या दोन लोकांना एके रायफलने गोळ्या घातल्या. या हल्ल्यात अमृतसर येथील रहिवासी अमृत पाल आणि रोहित यांचा मृत्यू झाला. तर, फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी दहशतवाद्यांनी पुलवामा येथे काश्मिरी पंडित संजय शर्मा यांची हत्या केली होती. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्ला