शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सीबीआयमध्ये नेते, अधिकाऱ्यांचे फोन झाले टॅप; सरकारचे चौकशीचे आदेश!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 06:29 IST

दोन संचालकांच्या वादामुळे चर्चेत आलेल्या सीबीआयच्या मागे चौकशीचे आणखी एक प्रकरण लागले आहे.

- हरिश गुप्ता नवी दिल्ली : दोन संचालकांच्या वादामुळे चर्चेत आलेल्या सीबीआयच्या मागे चौकशीचे आणखी एक प्रकरण लागले आहे. परवानगीविना नेते व अधिकाºयांच्या फोन टॅपिंग झाल्याच्या प्रकरणाचा तपास करून, अहवाल सादर करण्याचे निर्देश सरकारने गुप्तचर एजन्सीला दिले आहेत.हे प्रकरण केंद्रीय दक्षता आयोगाच्या (सीव्हीसी) अंतर्गत तपासात समोर आले होते आणि सीबीआयचे डीआयजी यांनीही सर्वोच्च न्यायालयातील याचिकेत म्हटले होते की, देशाच्या प्रमुख तपास एजन्सीमध्ये फोन टॅपिंग उघडकीस आली आहे. सीबीआयचे हटविण्यात आलेले संचालक अलोक वर्मा आणि त्यांचे सहकारी राकेश अस्थाना यांच्यातील संघर्षातही हा मुद्दा चर्चेला आलेला आहे.भ्रष्टाचाराच्या प्रकरणात फोन टॅप करण्याची सुविधा सीबीआयला दिलेली असते. मात्र त्यासाठी गृहखात्याची परवानगी घेणे आवश्यक असते. अत्यंत तातडीच्या प्रकरणात फोन टॅप करून त्यानंतर परवानगी घेण्याची मूभा सीबीआयला आहे. मात्र या व्यवस्थेचा दूरूपयोग केला गेला नाही ना? याचा तपास आता सरकार करणार आहे. सीबीआय अधिकाºयांनी केंद्रीय गृह सचिवांच्या परवानगीशिवाय आपले अधिकारी आणि राजकारणी यांचे मोबाइल आणि लँडलाइन फोन टॅप केल्याचे समजते. या बेकायदेशीर फोन टॅपिंगबाबत सरकार काळजीत आहे. वस्तुत: सरकारने अलोक वर्मा यांच्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका केलेली आहे. यात म्हटलेले आहे की, सीबीआय संचालकांनी दक्षता आयोगाच्या प्रश्नाला उत्तरे देण्यास नकार दिला. ते टेलिफोन टॅप करत होते आणि स्वत:च्या अधिकाराचा दुरुपयोग करत होते.सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना आणि रॉचे अधिकारी यांचे फोन विनापरवानगी टॅप झाले होते. सीबीआयचे डीआयजी मनीष कुमार सिन्हा यांच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालय मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत आहे.>सर्वोच्च न्यायालयात बुधवारी सुनावणीअलोक वर्मा यांचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात बुधवारी सुनावणीसाठी येणार आहे. या प्रकरणात सरन्यायाधीशांनी अशी टिप्पणी केली की, काही प्रकरणात दक्षता आयोगाचा अहवाल अस्पष्ट आहे. तो अलोक वर्मा यांच्याविरुद्ध आहे. सीबीआय डीआयजी मनीष कुमार सिन्हा यांनी फोन टॅपिंगची माहिती दिल्यानंतर सरकारची काळजी वाढली. अधिकारी आणि काही व्यक्तिंचे फोन परवानगीशिवाय टॅप झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कोणाचे फोन टॅप होत आहेत, हे माहीत होते. मात्र, काही प्रकरणात ही ओळख लपविण्यात आली.

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभाग