नळाचे मीटर चोरणारा गजाआड
By Admin | Updated: January 30, 2015 00:54 IST2015-01-30T00:54:14+5:302015-01-30T00:54:14+5:30
धंतोली पोलिसांची कारवाई : २४ मीटर जप्त

नळाचे मीटर चोरणारा गजाआड
ध तोली पोलिसांची कारवाई : २४ मीटर जप्त नागपूर : नळाचे मीटर चोरून नेणारा सराईत चोरटा धंतोली पोलिसांनी जेरबंद केला. सुशील छोटेलाल पटेल (वय २४, रा. दिघोरी बुजुर्ग) असे आरोपीचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून धंतोली तकिया भागातील नळाचे मीटर चोरीला जाण्याच्या घटना अचानक वाढल्या. वारंवार तक्रारी येत असल्यामुळे पोलीसही दडपणात आले होते. अखेर त्याची माहिती काढून आरोपी सुशीलला पोलिसांनी बुधवारी पहाटे अटक केली. त्याच्याकडून २४ मीटर आणि एक स्कुटी पोलिसांनी जप्त केली. धंतोलीचे ठाणेदार राजन आबाजी माने, पोलीस निरीक्षक शैलेश संख्ये यांच्या नेतृत्वात एपीआय जी. बी. सोनवणे, नायक प्रकाश ताकवत, अजय पंचभाई, सुशील रेवतकर, मनोज यादव, दीपक चौबे आदींनी ही कामगिरी बजावली.-----