तनिसी, वेस्ली, स्नेहा, नागेश, शांतेश विजेते

By Admin | Updated: September 7, 2015 23:27 IST2015-09-07T23:27:41+5:302015-09-07T23:27:41+5:30

मडगाव : मडगाव क्रिकेट क्लबतर्फे आयोजित अखिल गोवा पातळीवरील 36 व्या मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत तनिसी कीर्तनी, वेस्ली द रोझारियो, स्नेहा राणे, नागेश वेरेकर व शांतेश म्हापसेकर यांनी आपआपल्या गटात अव्वल स्थान प्राप्त केले.

Tanishais, Wesley, Sneha, Nagesh, Shantesh winners | तनिसी, वेस्ली, स्नेहा, नागेश, शांतेश विजेते

तनिसी, वेस्ली, स्नेहा, नागेश, शांतेश विजेते

गाव : मडगाव क्रिकेट क्लबतर्फे आयोजित अखिल गोवा पातळीवरील 36 व्या मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत तनिसी कीर्तनी, वेस्ली द रोझारियो, स्नेहा राणे, नागेश वेरेकर व शांतेश म्हापसेकर यांनी आपआपल्या गटात अव्वल स्थान प्राप्त केले.
स्पर्धा मडगाव येथील एमसीसीच्या टेबल टेनिस कोर्टवर आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेच्या बक्षीस वितरणास उद्योजक तथा माजी टेबल टेनिस खेळाडू दिनेश त्रिकन्नाड व अरुण वेर्लेकर उपस्थित होते. या वेळी एमसीसी क्लबचे अध्यक्ष योगेश नाईक, कोषाध्यक्ष एकनाथ कामत, जीटीटीएचे सचिव विष्णू कोलवाळकर यांचीही उपस्थिती होती. एमसीसीचे सचिव अपूर्व भेंब्रे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.
सविस्तर निकाल : मिनी कॅडेट- मुली- स्नेहा मेस्ता वि. वि. तृष्णा हम्मणवार 11-7, 11-9, 11-5. मुलगे- शांतेश म्हापसेकर वि. वि. अद्वैत मुद्रस 11-6, 11-3, 11-4. कॅडेट गट : मुली- स्नेहा राणे वि.वि. सनीशा शेट्ये 11-8, 11-3, 11-8. मुले- नागेश वेरेकर वि.वि. शांतेश म्हापसेकर 11-5, 13-11, 7-11 व 11-7. सब ज्युनियर गट : मुली- तनिसी कीर्तनी वि.वि. पृथा र्पीकर 11-9, 11-5, 11-3. मुलगे- वेस्ली द रोझारियो वि.वि. मंदार जोशी 12-10, 11-9, 11-9. (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Tanishais, Wesley, Sneha, Nagesh, Shantesh winners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.