तडप तडप जिया जाये...
By Admin | Updated: October 15, 2016 00:02 IST2016-10-15T00:02:17+5:302016-10-15T00:02:17+5:30
वडिलांची इच्छा म्हणून गाणे शिकायला निमुटपणे गुरूपुढे बसलेली माझ्यासारखी मुलगी मशहूर गायिका, प्रसिद्ध कलाकार वगैरे होइल, असे स्वप्नसुद्धा मला

तडप तडप जिया जाये...
बनारसला गंगेच्या काठी घडलेल्या
एका अद्वितीय आयुष्याची सफर : गिरिजा देवी
वडिलांची इच्छा म्हणून गाणे शिकायला निमुटपणे गुरूपुढे बसलेली माझ्यासारखी मुलगी मशहूर गायिका, प्रसिद्ध कलाकार वगैरे होइल, असे स्वप्नसुद्धा मला कधी पडले नसेल..!
शाळेचे फारसे तोंड न बघितलेली, आईचा मार खात घरीच हिंदी, संस्कृतचे धडे घेणारी, घोड्यावर मांड ठोकून त्याला पळवणारी आणि रोज हौशी-हौशीने गुडीयाकी शादी मनानेवली बनारसची एक सिधी लडकी होते मी...!
- मला बंडखोरी शिकवली मीरेने! स्वरांच्या प्रेमात बुडून जायला शिकवले सूरदासाने आणि माझे गाणे घेऊन जगण्यात उतरायला शिकवले ते आमच्या काशी-विश्वेश्वराने. त्याने मला माझे गाणे माझ्या जगण्याशी जोडून द्यायला शिकवले.