शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे ट्रॅकवर मृत्यूचा थरार, कॉलेजच्या बसला मालगाडीने उडवले, गाडीत होते २५ विद्यार्थी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 14:05 IST

तमिळनाडूमध्ये एका खासगी कॉलेजच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसला मालगाडीने धडक दिली.

Tamil Nadu Bus Accident: तमिळनाडूमध्ये एका खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या बसला मालगाडीने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात २० हून अधिक विद्यार्थी जखमी झाले आहेत. शनिवारी सायंकाळी वीरराक्कीयाम आणि पालयम दरम्यान असलेल्या मानवरहित रेल्वे क्रॉसिंगवर ही घटना घडली. या अपघातामुळे रेल्वे मार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खासगी इंजिनिअरिंग कॉलेजची बस शनिवारी सायंकाळी विद्यार्थ्यांना घेऊन जात होती. वीरराक्कीयाम आणि पालयम दरम्यान असलेल्या रेल्वे क्रॉसिंगवरून बस जात असताना, मागून येणाऱ्या एका मालगाडीने बसला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की बसचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून आतील विद्यार्थी जखमी झाले आहेत.

अपघातानंतर तातडीने मदतकार्य राबवून जखमी विद्यार्थ्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या भीषण अपघातात सुमारे २५ विद्यार्थी जखमी झाले. २३ विद्यार्थ्यांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर दोन गंभीर जखमींना खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. एका विद्यार्थ्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर विशेष उपचार सुरू आहेत. प्राथमिक उपचारानंतर तीन विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात आले आहे.

'ही आमची जबाबदारी नाही'; दक्षिण रेल्वेचे स्पष्टीकरण

या घटनेनंतर दक्षिण रेल्वेने एक महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. रेल्वेच्या म्हणण्यानुसार, हा अपघात ज्या मार्गावर झाला तो दक्षिण रेल्वेच्या अखत्यारीत येत नाही. हा रेल्वे मार्ग चेट्टीनाड सिमेंट्स या कंपनीचा खासगी मार्ग आहे. हा मार्ग त्यांच्या कारखान्यासाठी कच्चा माल नेण्या-आणण्यासाठी वापरला जातो. या मार्गावर अनेक ठिकाणी मानवरहित रेल्वे गेट्स आहेत, जिथे कोणताही सुरक्षारक्षक किंवा सिग्नल यंत्रणा नसते.

राजकीय नेत्यांची भेट

द्रविड मुन्नेत्र कळघमचे नेते सेंथिल बालाजी यांनी रुग्णालयात जाऊन जखमी विद्यार्थ्यांची विचारपूस केली. त्यांनी डॉक्टरांशी चर्चा करून विद्यार्थ्यांना सर्वोत्तम उपचार देण्याच्या सूचना केल्या. "प्रशासनाने या खासगी रेल्वे मार्गावरील सुरक्षेची तपासणी करणे गरजेचे आहे, जेणेकरून भविष्यात असे अपघात टाळता येतील," असे त्यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Train hits college bus in Tamil Nadu; many students injured.

Web Summary : A train collided with a college bus at an unmanned crossing in Tamil Nadu, injuring over 20 students. The railway clarified it was a private line, not under their jurisdiction. A politician visited the injured, urging safety checks on private lines.
टॅग्स :TamilnaduतामिळनाडूAccidentअपघात