तामिळनाडूत काँग्रेसमध्ये फूट
By Admin | Updated: November 4, 2014 02:16 IST2014-11-04T02:16:31+5:302014-11-04T02:16:31+5:30
तामिळनाडूतही मोठा धक्का बसला़तामिळनाडूतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जीक़े.वासन यांनी सोमवारी पक्षाला सोडचिठ्ठी देत नवी चूल मांडण्याचा निर्णय जाहीर केला़

तामिळनाडूत काँग्रेसमध्ये फूट
चेन्नई/नवी दिल्ली : अनेक आघाड्यांवर संघर्ष करीत असलेल्या काँग्रेसला तामिळनाडूतही मोठा धक्का बसला़तामिळनाडूतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जीक़े.वासन यांनी सोमवारी पक्षाला सोडचिठ्ठी देत नवी चूल मांडण्याचा निर्णय जाहीर केला़
या घोषणेनंतर काँग्रेसनेही तात्काळ कारवाई करीत वासन यांना पक्षातून बडतर्फ केले़ काँग्रेसबद्दल अनुचित टीकाटिप्पणी केल्याबद्दल वासन यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आल्याचे पक्ष प्रवक्ते अजय कुमार यांनी नवी दिल्लीत स्पष्ट केले़ चेन्नईत पत्रकार परिषदेत वासन यांनी आम्ही लवकरच स्वतंत्र पक्ष स्थापन करणार आहोत, असे सांगितले़ ४७ वर्षांत काँग्रेसला राज्यात सत्ता मिळवता आली नाही़ ही स्थिती सुधारण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न मुळीच समाधानकारक नाहीत़ यामुळेच आपण बाहेर पडत असल्याचे ते म्हणाले़ तथापि पक्षाध्यक्ष सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर वैयक्तिक टीका करणे त्यांनी टाळले़ (वृत्तसंस्था)