शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

सर्वांना मोफत कोरोना लस! निवडणुकीआधी "या" सरकारने केली मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2021 16:33 IST

Corona Vaccine : कोरोनाच्या मोफत लसीसोबतच राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोठी भेट दिली.

नवी दिल्ली - तामिळनाडूमध्ये (Tamilnadu) कोरोना लसीसंदर्भात (COVID-19 vaccine) एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एडप्पादी के. पलानीस्वामी यांनी सर्वांना मोफत कोरोना लस देण्याची घोषणा केली आहे. शुक्रवारी विधानसभेच्या अधिवेशनाला संबोधित करताना पलानीस्वामी यांनी "आम्ही पूर्वी जाहीर केल्यानुसार सर्वांना कोरोना लस मोफत देऊ आणि तामिळनाडूला कोरोना व्हायरसपासून मुक्त करू" असं म्हटलं आहे. 

मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर सत्ताधारी पक्षाचे आमदार एम. सेम्मलाई यांनी कोरोनाची लस राज्यातील सर्वसामान्यांना आणि आमदारांना मिळण्यासाठी किती वेळ लागेल असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना आरोग्यमंत्री सी विजयभास्कर यांनी कोरोनाच्या संकटात अग्रस्थानी काम करणाऱ्या 1,33,000 आरोग्य कर्मचार्‍यांना कोरोनाची लसी देण्यात आली आहे. यानंतर कोरोनाच्या लसीकरणासाठी पोलीस, महसूल कर्मचार्‍यांसह साडे आठ लाखांहून अधिक लोकांचा विचार सुरू आहे.

कर्ज घेतलेल्या 16.43 लाख शेतकऱ्यांचा होणार फायदा

कोरोनाच्या मोफत लसीसोबतच राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोठी भेट दिली. तामिळनाडू सरकारने विधानसभेत 12,110 कोटी रुपयांची कर्जमाफी जाहीर केली आहे. सहकारी बँकांकडून कर्ज घेतलेल्या 16.43 लाख शेतकर्‍यांना याचा फायदा होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी "राज्यात चक्रीवादळ वादळ, खराब हवामान आणि मुसळधार पावसाचा शेतीवर परिणाम होतो. तसेच त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो. त्यामुळे कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला" असल्याचं म्हटलं आहे. 

आशेचा किरण! "या" लसीची कमाल, पहिल्या डोसनंतर कोरोनाच्या संसर्गात 67 टक्क्यांनी घट, रिसर्चमधून दावा

कोरोनामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली असतानाच लसीबाबत एक दिलासादायक माहिती आता समोर आली आहे. कोरोना व्हायरसच्या अनेक लसी या शर्यतीत पुढे असून एस्ट्राजेनेका लसीला मोठं यश मिळालं आहे. विद्यापीठ आणि एस्ट्राजेनेका कंपनी यांनी संयुक्तरीत्या तयार केलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतल्यानंतरच कोरोना व्हायरसचा संसर्ग होण्याचं प्रमाण 67 टक्क्यांनी कमी झालं आहे. कोरोनाच्या प्रसारावर निर्बंध आणण्यासाठी ही लस परिणामकारक ठरत आहे, असं ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या रिसर्चमधून स्पष्ट झालं आहे. कोरोनाच्या संकटात लस परिणामकारक ठरत असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. रिसर्चमध्ये लोकसंख्येतील संसर्गग्रस्तांची संख्या कमी करून कोरोनाचा संसर्ग कमी करण्यावर या लसीचा मोठा परिणाम होऊ शकतो असं म्हटलं आहे. तसेच लसीमुळे होणारा फायदाही अधिक आहे.

 

 

टॅग्स :Tamilnaduतामिळनाडूcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसFarmerशेतकरी