शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

'DMK म्हणजे डेंग्यू, मलेरिया अन्...', तामिळनाडू भाजपाध्यक्ष अन्नामलाई यांचा स्‍टॅलिन यांच्यावर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2023 00:13 IST

तामिळनाडूचे भाजप अध्यक्ष के. अन्नामलाई (K.Annamalai) यांनी गुरुवारी DMK चा नवा फुल फॉर्म सांगत स्टॅलीन यांच्यावर थेट हल्ला चढवला...

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलीन यांचे पुत्र तथा DMK नेते उदयनिधी स्टॅलीन यांनी सनातन धर्मासंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर, आता भाजपनेही पलटवार केला आहे. तामिळनाडूचे भाजप अध्यक्ष के. अन्नामलाई (K.Annamalai) यांनी गुरुवारी डीएमकेवर थेट हल्ला चढवला. त्यांनी DMK चा नवा फुल फॉर्म सांगत, डीएमकेची तुलना 'डेंग्यू, मलेरिया आणि कोसु'सोबत केली आहे.

अन्नामलाई यांनी एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) व्हिडिओ पोस्ट करत म्हटले आहे, "जर तामिळनाडूतून एखादी गोष्ट संपुष्टात आणायची असेल, तर ती म्हणजे 'डीएमके'. डी म्हणजे डेंग्यू, एम म्हणजे मलेरिया आणि के म्हणजे कोसू." 'कोसू' हा तम‍िळ शब्दअसून, तो एखाद्या घातक आजाराशी संबंधित आहे. पुढे अन्नामलाई म्हणाले, आम्हाला विश्वास आहे की, लोक हे घातक आजार डीएमकेशी जोडतील आणि त्यांना राज्‍यातून उखडून टाकण्याचा प्रयत्न करतील.

स्‍टॅल‍ीन यांच्यावर हल्ला चढवत अन्नामलाई म्हणाले, मी आपल्याला आव्हान देतो, या येणाऱ्या निवडणुकीत 'सनातन धर्मा'च्या मुद्द्यावर लढू. डीएमकेचे म्हणणे आहे की, ते 'सनातन धर्म' नष्ट करणार आहे. आम्ही म्हणून, आम्ही संरक्षण करू आणि 'सनातन धर्म' सुरक्षित ठेवू. बघूया तामिळनाडूतील लोक कुणाला मतदान करतात? आम्हाला अनेक वर्षांपासून डीएमकेचे नाटक माहीत आहे.

राज्यातील जनता 'हे' काम करेल -अन्नामलाई म्हणाले, आपण सत्तेवर आल्यानंतर, पहिल्या वर्षी 'सनातन धर्मा'चा विरोध करता. दुसऱ्यावर्षी तो नष्ट करण्याची भाषा बोलता. तिसऱ्या वर्षी 'सनातन धर्मा'ला कृरपणे नष्ट करू इच्छिता. चौथ्या वर्षी म्हणता, आपण हिंदू आहात आणि पाचव्या वर्षी म्हणता, डीएमके पार्टीचे 90% लोक हिंदू आहेत. पाचव्या वर्षी म्हणता, आपण हिंदू आहात. 2024 मध्ये एक पक्ष म्हणून डीएमकेचा साफ होणार आहे. तसेच, मी हे म्हटले नाही की, तुमचा मुलगा असे यामुळे म्हणाला, कारण D चा अर्थ 'डेंग्यू', M चा अर्थ 'मलेरिया' आणि K चा अर्थ 'कोसू' होतो. राज्यातील जनता हे काम करेल, असेही अन्नामलाई म्हणाले.

 

टॅग्स :BJPभाजपाTamilnaduतामिळनाडूHinduismहिंदुइझमPoliticsराजकारण