TVK Vijay To Be Alliance With BJP: देशात पुन्हा एकदा निवडणुकांची धामधूम सुरू होणार आहे. भारतीय निवडणूक आयोग पाच महत्त्वाच्या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करण्याची शक्यता आहे. यामध्ये पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरी यांचा समावेश आहे. या निवडणुकीपूर्वी राज्यातील सर्वच प्रमुख पक्षांकडून आघाड्यांचे गणित जुळवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून विजय यांच्या टीव्हीके पक्षाला एनडीएमध्ये आणण्यासाठी भाजपाने प्रयत्न सुरू केले आहेत.
तामिळनाडूच्याराजकारणातील सध्याची परिस्थिती पाहता टीव्हीके पक्ष एनडीएमध्ये सहभागी झाल्यास राज्याच्या राजकारणावर त्याचा फार मोठा प्रभाव पडू शकतो. विजय यांनी टीव्हीके या पक्षाची स्थापना केल्यापासून ते तामिळनाडूच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरलेले आहेत. त्यामुळे विजय यांचा पक्ष एनडीएमध्ये सहभागी झाला तर थोड्याशा मतांचा फरक पडला तरी निकाल बदलू शकतो.
BJP-TVK युती अंतिम टप्प्यात
तामिळनाडू विधानसभा निवडणुका जवळ येत असताना, राजकीय घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, अभिनेता-राजकारणी विजय यांच्या पक्ष, तमिलगा वेट्टी कझगम (टीव्हीके) आणि भाजपा यांच्यातील युतीची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. भाजपाने विजय यांना युतीत सामील होण्यासाठी एक महत्त्वाची ऑफर दिली आहे. भाजपाने विजय यांच्या पक्षाला ८० जागा देऊ केल्या आहेत. याशिवाय, भाजपाने विजय यांना उपमुख्यमंत्री बनवण्याचा प्रस्ताव दिला आहे. परंतु, काही रिपोर्टनुसार, विजय यांना मुख्यमंत्रीपद हवे आहे आणि यामुळे चर्चेत अडथळे निर्माण होत आहेत.
दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपा वेगवेगळ्या माध्यमातून विजय यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये वेगवेगळे नेते मध्यस्थी करत असून, त्यात एका राज्याचे उपमुख्यमंत्रीही महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. मात्र सध्यातरी ही चर्चा प्राथमिक टप्प्यात आहे. मात्र या आघाडीबाबत सध्या अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. तसेच विजय यांचा पक्ष एनडीएत आल्यास त्यामुळे होणाऱ्या राजकीय नफा नुकसानीचा अंदाज बांधला जात आहे.
Web Summary : BJP woos actor Vijay's TVK party for Tamil Nadu alliance, offering Deputy CM post and 80 seats. Negotiations are ongoing, with potential impact on state politics.
Web Summary : भाजपा ने अभिनेता विजय की टीवीके पार्टी को तमिलनाडु गठबंधन के लिए उपमुख्यमंत्री पद और 80 सीटों की पेशकश की। बातचीत जारी है, जिससे राज्य की राजनीति पर प्रभाव पड़ सकता है।